Wednesday, September 16, 2026
Homeजळगाववरणगावात अतिक्रमण व पार्किंगमुळे रहदारीला अडथळा

वरणगावात अतिक्रमण व पार्किंगमुळे रहदारीला अडथळा

अनिल पाटील

वरणगाव, Varangaon ता.भुसावळ ।

- Advertisement -

शहरातील बसस्टँडचा मुख्य चौक, बसस्टँड परिसर (Busstand premises), प्रमुख मार्ग बाजारपेठेमध्ये वाढत्या अतिक्रमणामुळे (increasing encroachment) व बेशिस्त वाहन पार्कींग (Unruly vehicle parking) मुळे वाहतुकीला अडचण (Difficulty in transportation) निर्माण होत असुन नगरपरीषद व पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरीकांना मात्र याचा त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे

शहरातील मुख्य बाजारपेठ (Main market) ही हनुमान व्यायाम शाळा ते महात्मा गांधी विद्यालय या प्रमुख रस्त्यावर आहे. हनुमान व्यायाम शाळा ते रामपेठपर्यंत दुतर्फा गोरक्षण नाला व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या जागेवर अतिक्रमण (increasing encroachment) करुण पक्के दुकाने व घरे बांधण्यात आली आहे. तर रामपेठ ते बसस्टँड चौकापर्यत एका बाजुने गोरक्षण नाल्यावर अतिक्रण करण्यात आले आहे.

या अतिक्रमीत पक्या दुकानाच्या पुढे ही काही दुकानदारांनी हवाई शेड निर्माण केलेले असुन दुकान सोडून ते भर रस्त्यावर आपले दुकान थाटतात हिच परिस्थीती बसस्टँड चौक ते महात्मा गांधी विद्यालयापर्यंत आहे.

त्यामुळे या दुकांनामध्ये येणारे ग्राहकांनी त्यांची वाहने दुकानासमोर (Unruly vehicle parking) उभी करित असल्याने 24 मिटरचा रोड 10 मीटरचा होतो यावर कहर म्हणजे बसस्टँड चौकातील बढे कॉम्पेलेक्स व समर्थ कॉम्पेलेक्स समोर प्रवाशांना भुसावळ जाण्याकरीता रिक्षाचा थांबा असल्याने भर रस्त्यात अस्ताव्यस्त रिक्षा लागलेल्या असतात तर बाजारात आलेले ग्राहक व सकाळ पासुन ते संध्याकाळपर्यत बाहेर गांव जाणारे प्रवासी त्यांची वाहने या कॉम्पेलेक्स समोर पार्क करीतात आणि या पार्क केलेले रिक्षा व वाहनांच्या पुढे हातगाडीवर भाजीपाला व फळे विक्रेते त्यांच्या गाड्या लावुन अतिक्रमण (encroachment) करीत असल्याने शंभर मिटरच्या वर परीघ असेला बसस्टँड चौक 10-15 मिटरचा झालेला असतो.

मग जेव्हा एस.टी. व अवजड वाहण समोरा समोर येतात तेह्वा या ठीकाणी वाहतुक ठप्प्प होते. जाम झालेली वाहतूक मोकळी करण्यासाठी ट्राफिक पोलीस (Traffic police) मात्र या ठिकाणी उपस्थित नसतो. त्यामुळे काही वेळेस वाहनधारकांच्या धक्काबुक्कीवरून भानगडी होतात. त्यावेळेस एखादा सुज्ञ नागरिक पुढे येऊन जाम झालेली वाहतूक सुस्थितीत करण्याचा प्रयत्न करतो.

अशा पद्धतीने तू-तू, मैं-मै व मध्यस्थीने वाहतुक पुन्हा पूर्ववत होते. असे नित्याचीच असल्याने नागरीकांना या परिस्थितीची सवय झालेली आहे. अशा या बेशिस्त वाहनांमुळे व अतिक्रमणांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या बाबींकडे मात्र नगरपरीषद (Municipal Council) व पोलीस प्रशासनास (Police administration) दिसत असून सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याने दुकानदार व्यवसायी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन कायम स्वरूपी बस स्टँड चौक मुख्य रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावे हीच सुज्ञ नागरिक अपेक्षा करीत आहे.

ताज्या बातम्या

Nashik : निष्काळजी ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे महापौरांचे आदेश

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik कृषीनगर येथे जलवाहिनीच्या कामासाठी रस्त्यावर ठेवलेल्या पाईपला दुचाकी धडकल्याने सिद्धार्थ गोरे या युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद आज बुधवारी (दि....