Monday, November 23, 2026
HomeनाशिकNashik News : अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा

Nashik News : अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा

नाशिक | Nashik

राष्ट्रीय कृषी विकास योजना-प्रतिएक थेंब अधिकाधिक पीक या घटकांतर्गत सन 2025-26 मध्ये जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पूरक अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी (Farmer) योजनेचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.

- Advertisement -

या योजनेमध्ये अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थींना मार्गदर्शक सूचनांनुसार 55 टक्के व बहुभूधारक यांना 45 टक्के अनुदान देय आहे. तसेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनांतर्गत अतिरिक्त अनुक्रमे 25 टक्के व 30 टक्के पूरक अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित 10 टक्के व 15 टक्के अनुदान अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत देण्यात येते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना मंजूर मार्गदर्शक तत्त्वांनुसार 90 टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे. चुकीची माहिती भरल्यास अर्ज (Application) रद्द होण्याची शक्यता आहे.

अर्ज करण्यासाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर (Mahadibit Portal) ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधार कार्ड, बँक पासबुक व जातीचा दाखला संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ 5 हेक्टरपर्यंत देण्यात येईल. तसेच अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जाची पडताळणी झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना लघु संदेशाद्वारे कळविण्यात येईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत कंपनीच्या अधिकृत वितरकाकडूनच संच खरेदी करावा. संच बसविल्यानंतर कृषी अधिकारी यांच्याकडे अनुदानासाठी देयके सादर करावीत. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना कृषी अधिकारी यांच्या मार्फत त्यांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येईल, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. माने यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : ‘ग्रो इन्व्हेस्टर’ फसवणूक प्रकरणातील आरोपी फरार माहिती देणार्‍यास पोलिसांकडून...

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur अल्पावधीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणार्‍या ‘ग्रो इन्व्हेस्टर’ कंपनीच्या प्रकरणात अहिल्यानगर पोलीस दलाने पावले उचलली आहेत. गुन्ह्यातील...