Friday, February 13, 2026
HomeनाशिकNashik News: मिलिंद नगरला अतिक्रमण निर्मूलन मोहिम; २७ घरांचे काढले अतिक्रमण

Nashik News: मिलिंद नगरला अतिक्रमण निर्मूलन मोहिम; २७ घरांचे काढले अतिक्रमण

नवीन नाशिक | प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणाकरिता महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे शहरातील मिलिंद नगर झोपडपट्टीतील २७ घरे जमीनदोस्त करण्यात आले.

सिटी सेंटर सर्कल येथे होणारी वाहतूक कोंडी रोखण्याकरिता आर डी सर्कल वरून मायको सर्कल कडे जाण्याकरिता नंदिनी नदीवर पूल उभारून याठिकाणी १०० फुटी रस्ता करण्याचे काम काही दिवसांत सुरु होणार आहे.

- Advertisement -

गोरेगावातील ४५ मजली इमारतीत आग, अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु

YouTube video player

या पार्श्ववभूमीवर रस्त्यात अडथळा येणाऱ्या तब्बल २७ घरांना महापालिकेतर्फे नोटीस देण्यात आली होती. त्याठिकाणच्या रहिवाशांना महापालिकेतर्फे मोकळा भूखंड देण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता महापालिकेतर्फे याठिकाणचे अतिक्रमण हटवण्यास सुरवात करण्यात आली. यावेळी अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

मिलिंद नगरला अतिक्रमण निर्मूलन मोहिम;  २७ घरांचे काढले अतिक्रमण

यावेळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ताज्या बातम्या