Friday, April 25, 2025
Homeनगर24 व्यावसायिकांची याचिका न्यायालयाने फेटाळली

24 व्यावसायिकांची याचिका न्यायालयाने फेटाळली

लवकरच सदर ठिकाणची अतिक्रमणे निघणार, अधिकार्‍यांची माहीती

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील सर्कल परिसरातील सुमारे 24 व्यावसायिकांनी अतिक्रमण हटविण्यात येऊ नये, म्हणून येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केला होती. त्यांनी दाखल केलेला दावा न्यायालयाने फेटाळला असून लवकरच त्याठिकाणचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिक्रमण अधिकारी संजय शेळके यांनी सांगितले. सध्या शहरात अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरु आहे. अनेक ठिकाणचे अतिक्रमणे काढण्यात आली असून आपले नुकसान होऊ नये म्हणून अनेक व्यावसायिक आपले अतिक्रमणे काढताना दिसत आहे. त्यातच शहरातील सर्कल परिसरातील सुमारे 24 व्यावसायिकांनी श्रीरामपूर दिवाणी न्यायालयात अतिक्रमण काढण्यात येऊ नये म्हणून दावा दाखल केला होता.

- Advertisement -

त्यांचा दावा न्यायालयाने फेटाळला. यामध्ये अजीज खान, राहुल पवार, चंद्रभागा चव्हाण, मतीन शेख, लक्ष्मण पवार, इम्तियाज खान, रफिक सय्यद, भागवत बोंबले, अब्दुल सय्यद, अजित सिंग, सलिम शेख, दीपक मलिक, राजू शेख, अल्ताफ जहागीरदार, अख्तर पठाण, युनूस पठाण, हनुमंत वैष्णव, सचिन आमले, संदीप काळे, नामदेव झरेकर, इम्रान शेख, तनवीर तांबोळी, तेजस वैष्णव, अमोल शिंदे या 24 व्यावसायिकांनी येथील कोर्टात याचिका दाखल केला होती. परंतू त्यांचा दावा न्यायालयाने फेटाळली, काही दिवसांतच या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे अतिक्रमण अधिकार्‍यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...