Thursday, November 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCrime : घरात घुसून दाखवला चाकूचा धाक; रोख रकमेसह सोने केले लंपास

Crime : घरात घुसून दाखवला चाकूचा धाक; रोख रकमेसह सोने केले लंपास

येवला | प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

शहरातील मिल्लतनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पाच अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत घरात घुसून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत चोरट्यांनी आठ हजार रुपयांची रोकड आणि अंदाजे दीड तोळे सोने लंपास केले. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे तीन वाजेच्या सुमारास पाच अज्ञात चोरट्यांनी सालिम शकील शेख यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. हातात चाकू घेऊन त्यांनी घरातील सदस्यांना धाक दाखवला. त्यानंतर तब्बल एक ते दीड तास घरातील साहित्याची झडती घेत मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला. यावेळी चोरट्यांनी आठ हजार रुपयांची रोकड आणि दीड तोळे सोने चोरून नेले.

चोरी नंतर तीन मोटारसायकलींवरून घटनास्थळावरून चोरांनी पलायन केले. विशेष म्हणजे, सर्व चोरट्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहेत.

दरम्यान, शहरातील गजबजलेल्या वस्तीत मध्यरात्री चाकूचा धाक दाखवत लुटमार होण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या घटनेतील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, तसेच रात्रीची पोलिस गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मिल्लतनगरमधील नागरिकांकडून होत आहे.

ताज्या बातम्या

एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनांवर विशेष कारवाई मोहीम

0
नाशिक, दि. 26 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 50 नुसार सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक...