Thursday, November 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजएचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनांवर विशेष कारवाई मोहीम

एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनांवर विशेष कारवाई मोहीम

वाहनधारकांनी नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन

- Advertisement -

नाशिक, दि. 26 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) :

केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 50 नुसार सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुषंगाने परिवहन विभागामार्फत एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनांवर विशेष कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. वाहनधारकांनी https: // maharashtrahsrp.com अथवा https : // transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर अर्ज करून एचएसआरपी नंबर प्लेट बसवून दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन परिवहन परिवहन विभागाने केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिकच्या कार्यक्षेत्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या एकूण 11 लाख 20 हजार 999 वाहनांपैकी 4 लाख 18 हजार 318 इतक्या वाहनांवरच एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत. 1 जुलै 2026 पासून एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनांवर कारवाई सुरू असून आतापर्यंत 12 हजार 683 वाहनांवर कारवाई करून सुमारे 10 लाख 52 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी मे. एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स प्रा. लि. या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर विशेष तपासणी व कडक कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी विलंब न करता आपल्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवाव्यात, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.

ताज्या बातम्या

onion : लासलगाव बाजार समितीत कांदा दरात घसरण सुरूच; कांदा उत्पादक...

0
लासलगाव | वार्ताहर Lasalgaon लासलगाव बाजार समितीत गेल्या नऊ दिवसांत कांद्याचे दर १७४९ रुपयांनी गडगडले आहेत.आधीच दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर...