Thursday, November 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजonion : लासलगाव बाजार समितीत कांदा दरात घसरण सुरूच; कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये...

onion : लासलगाव बाजार समितीत कांदा दरात घसरण सुरूच; कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

- Advertisement -

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

लासलगाव बाजार समितीत गेल्या नऊ दिवसांत कांद्याचे दर १७४९ रुपयांनी गडगडले आहेत.आधीच दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर बाजारभाव घसरणीचे नवे संकट उभे राहिले आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत असल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरु झाली आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दि.१८ रोजी लाल कांद्याची कमाल ५७०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाली होती. त्यानंतर कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. काल बुधवारी कांद्याच्या दरात १५२० रुपये पर्यंत घसरण नंतर आज सलग दुसऱ्या दिवशी दोनशे रुपयांची घसरण झाली .गेल्या नऊ दिवसांत कांद्याच्या दरात तब्बल १ हजार ७४९ रुपयांची घट नोंदविण्यात आली असून. कांद्याचे दर चार हजार रुपयांच्या खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

लासलगाव बाजार समितीत आज गुरुवारी ५८३ वाहनांतून ७४९४ क्विंटल कांद्याची आवक झाली लाल कांद्याला जास्तीत जास्त ३ हजार ९५१ रुपये, कमीत कमी १ हजार ५८० रुपये, सरासरी ३ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गेल्या आठवड्यात ५ हजार ७०० रुपये इतका चांगला बाजारभाव मिळत असतांना दर घसरून चार हजाराच्या आत आल्याने दरातील घसरणीमुळे आर्थिक गणित कोलमडल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.

शेतकरी दुहेरी संकटात
एकीकडे टँकरच्या पाण्यामुळे उत्पादन खर्चात झालेली वाढ, दुष्काळामुळे उत्पादनावर झालेला परिणाम आणि दुसरीकडे बाजारभावातील घसरण, अशा दुहेरी संकटात कांदा उत्पादक शेतकरी सापडला आहे. शेतमजुरी, खते, औषधे, सिंचन आणि वाहतूक खर्च वाढलेला असताना मिळणारा बाजारभाव उत्पादन खर्चाची भरपाई करण्यासाठी पुरेसा ठरत नाही. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने कांद्याचे बाजार भाव टिकून राहण्यासाठी उपाय योजना करावी
रामदास गुंजाळ, कांदा उत्पादक नन्हावे ता.चांदवड

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा भारतीय कांद्यापेक्षा प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते २ हजार रुपयांनी स्वस्त उपलब्ध होत असल्याने त्याचा भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनोज जैन कांदा निर्यातदार

ताज्या बातम्या

Crime : घरात घुसून दाखवला चाकूचा धाक; रोख रकमेसह सोने केले...

0
येवला | प्रतिनिधी Yeola शहरातील मिल्लतनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पाच अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत घरात घुसून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत...