मुंबई | Mumbai
बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘सिंघम अगेन’ (Singham Again) चित्रपट मागील काही दिवसापासून चर्चेत आहे. रोहित शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून यात अजयसह अनेक मोठे स्टार्स दिसणार आहेत. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाने बजेटच्या ८० टक्के कमाई केली आहे. सिंघम अगेनसाठी नॉन थिएट्रिकल करार करण्यात आला आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ‘सिंघम अगेन’ चे सॅटेलाइट, डिजिटल आणि म्युझिक राइट्स २०० कोटी रुपयांना विकले गेले आहेत.
हे देखील वाचा : Bigg Boss Marathi 5 Winner : सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सिझन 5 चा विजेता
एका सूत्राने याबाबत सांगितले की, अजय देवगण आणि रोहित शेट्टीसाठी (Rohit Shetty) हा सर्वात मोठा करार आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटांना प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीमुळे सॅटेलाइट प्लेयर्सकडून नेहमीच मोठी रक्कम मिळाली आहे. त्याचबरोबर डिजिटल प्लेयर्सने सिंघम अगेनला प्रीमियम किंमत देखील दिली आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ २५० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. याचा अर्थ असा की चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच सॅटेलाइट, डिजिटल आणि संगीत हक्क विकून बजेटच्या जवळपास ८० टक्के रक्कम वसूल केली आहे. आता ‘सिंघम अगेन’ फक्त ५० कोटी रुपये कमवून संपूर्ण खर्च वसूल करू शकतो.
हे देखील वाचा : Ratan Tata Death : रतन टाटांच्या निधनामुळे जिवलग मैत्रिणीच्या भावनांचा बांध फुटला; जुना फोटो शेअर करत म्हणाल्या…
दरम्यान, अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ येत्या १ नोव्हेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, करीना कपूर आणि दीपिका पदुकोण सारखे स्टार्स या चित्रपटाचा भाग आहेत. ‘सिंघम अगेन’ मध्ये अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे दिवाळीत (Diwali) या चित्रपटाची टक्कर कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ सोबत होणार आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारणार? हे पहावे लागणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा