Saturday, November 9, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRatan Tata Death : रतन टाटांच्या निधनामुळे जिवलग मैत्रिणीच्या भावनांचा बांध फुटला;...

Ratan Tata Death : रतन टाटांच्या निधनामुळे जिवलग मैत्रिणीच्या भावनांचा बांध फुटला; जुना फोटो शेअर करत म्हणाल्या…

मुंबई | Mumbai

भारताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या जाण्याने अवघा देश हळहळला आहे. रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोशल मीडियावर विविध पोस्टचा अक्षरशः महापूर आला आहे. सिनेविश्वातील कलाकार मंडळीनीदेखील टाटा यांना पोस्टच्या माध्यमातून निरोप दिला.

- Advertisement -

हे देखील वाचा : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

यामध्ये कधीकाळी त्यांनी जिच्यावर जिवापाड प्रेम केलं अशा रतन टाटांच्या जीवलग मैत्रिण आणि अभिनेत्री सिमी ग्रेवाल (Actress Simi Garewal) यांच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सिमी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ते म्हणतायंत तू निघून गेला आहेस. तुझ्या जाण्याने झालेले नुकसान सहन करणे खूप कठीण आहे… खूपच कठीण. अलविदा मित्रा.’ सिमी यांनी त्यांचा आणि रतन टाटा यांचा एक फोटोही या पोस्टसोबत शेअर केला आहे. सिमी आणि रतन टाटा यांचे खूप खास नाते होते आणि हे नाते अभिनेत्रीने अनेकदा मान्यही केले होते.

हे देखील वाचा : Ratan Tata Death : राज्य सरकारकडून एक दिवसाचा दुखवटा जाहीर; रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

प्रसिद्ध अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांचा रतन टाटांवर जीव जडला होता. त्या जीवापाड प्रेम करायच्या. २०११ मध्ये ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत (Interview) स्वतः सिमी ग्रेवाल यांनी हे मान्य केले होते. तसेच सिमी ग्रेवाल यांना रतन टाटा यांच्यासोबतच्या नात्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना अभिनेत्रीने म्हटले होते की, त्यांना काही काळ रतन टाटा यांना डेट केले होते. नंतर त्यांचं ब्रेकअप झाले, पण, ते नेहमीच चांगले मित्र राहिले आहेत, असे त्या म्हणाल्या होत्या.

हे देखील वाचा : Raj Thackeray Tribute to Ratan Tata : कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक…; रतन टाटांच्या जाण्याने राज ठाकरे गहिवरले

दरम्यान, सिमी यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर त्यांचा लोकप्रिय शो Rendezvous with Simi Garewal साठी लिहिलेल्या वर्णनात असे म्हणले होते की, ‘रतन टाटा हे मुंबईतील माझे पहिले मित्र होते. आम्ही दोघे नुकतेच परदेशातून परतलो होतो, दोघेही पुढे सामोरे जावे लागणाऱ्या अज्ञात जगाच्या उंबरठ्यावर उभे होतो. अनेक दशकानंतरही त्याचे व्यक्तीमत्व बदलले नाही. तो अजूनही लाजाळू आहे, संयमशील आहे, पण नेहमी स्पष्ट आणि दयाळू आहे. कामाच्या ठिकाणी तो कॉर्पोरेट दुरदृष्टी असणारा आहे, तर ऑफिसपासून (Office) दूर असताना एक एकांतवासी आहे, असे त्यांनी म्हटले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या