नाशिक | प्रतिनिधी
आपल्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात ज्यांनी कोणाला कधी ब्लॅकमेल केले नाही. कोणाला खंडणी मागितली नाही. तोडपाणी केल्या नाहीत, अशा एका सुसंस्कृत महिला उमेदवार सीमा हिरे यांच्या पाठीशी संपूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघातील जनतेने पुन्हा ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेना उपनेते विजय करंजकर यांनी केले.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजप, महायुतीच्या उमेदवार सीमा महेश हिरे यांच्या प्रचारार्थ सावतानगर येथे बुधवारी झालेल्या चौक सभेत करंजकर यांनी आवाहन केले. करंजकर म्हणाले, चुकीच्या माणसाच्या हातात नाशिक पश्चिमची आमदारकी गेली तर कंपन्या बंद पडतील आणि रोजगार कमी होईल. कारण प्रतिस्पर्धी उमेदवारांची पार्श्वभूमी ही तशा गोष्टींना खतपाणी घालणारी आहे. महायुतीच्या देणाऱ्या सरकारने लाडकी बहीण योजना राबवून महिलांना प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून देण्याच मोठ काम केलं आहे. म्हणून नवीन नाशिक, सातपूर इंदिरानगरच्या सर्व महिला सीमा हिरे यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे, असेही करंजकर म्हणाले.
हे ही वाचा: Nashik Political: अपप्रचाराला बळी पडू नका; विकासकामांना साथ द्या – आ. नितीन पवार
व्यासपीठावर गुजरातच्या जामनगरचे आमदार देवेश अकबरी, माजी पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातील प्रसिद्ध अभिनेता श्याम राजपूत, शिवसेना शहरप्रमुख प्रवीण तिदमे, श्यामकुमार साबळे, भाग्यश्री ढोमसे, मुकेश शहाणे, सुधाकर जाधव, मंदाकिनी जाधव, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, रवी पाटील, अनिल मटाले, अतुल सानप, डॉक्टर वैभव महाले, अशोक पवार आदी मान्यवर उपस्थित होते. सभेला शेकडो नागरिक उपस्थित होते.
महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी प्रभाग क्रमांक २७ मधील सिडकोची सहावी स्कीम, उपेंद्रनगर, अंबडगाव, मारुती मंदिर परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कमळाच्या फुलांचा हार घालून हिरेंचा सत्कार केला. रॅलीत राकेश दोंदे, प्रतिभा पवार, कावेरी घुगे, बाळासाहेब पाटील, शरद फडोळ, अरुण दातीर, समाधान दातीर, आदित्य दोंदे, राहुल दोंदे, संदीप दोद, ज्योती कवर, वामनराव दातीर आदीसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.
हे ही वाचा: Nashik Political: अजितदादांच्या रेकॉर्डब्रेक सभेने वातावरण फिरले
सायंकाळच्या सुमारास प्रभाग क्रमांक २६ आणि २८ मधील आयटीआय पूल, शाहूनगर, शिवशक्ती चौक, खुटवडनगर, भागातून प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीत सीमा हिरेंसह हास्यजत्रा फेम अभिनेता श्याम राजपूत, अलका अहिरे, हर्षदा गायकर, सुवर्णा मटाले, मोहिनी पवार, अशोक पवार, उखा चौधरी सुरेश गांगुर्डे, बापू गांगुर्डे, संदीप गायकर आदीसह कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दरम्यान सीमा हिरे यांना पाठिंबा देण्यासाठी स्थानिक संस्था, संघटना स्वतःहून पुढे येत आहेत. गुरुवारी अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ (महाराष्ट्र राज्य) या संस्थेने हिरे यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र सुपूर्त केले. पत्रावर अध्यक्ष हनुमंत सुतार, राज्य उपाध्यक्ष सारिका नागरे, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास धनगर, जिल्हाध्यक्ष भगवान थोरात यांच्या सह्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा