कळवण । Kalvan
पाणदेव स्व. ए. टी. पवार यांनी आपले अख्खे आयुष्य कळवण तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी खर्ची केले. तालुक्याच्या प्रत्येक पाऊलवाटेवर त्यांच्या घामाचे ठसे आहेत. प्रत्येक गावाचा, वाड्या-वस्तीचा विकास हाच त्यांचा ध्यास होता. कळवण तालुक्यात पाणी खेळवत ठेवत त्यांनी शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय घेतले. ज्याचा विकासाशी काहीएक संबंध नाही ते अपप्रचार करत फिरत आहेत. पाणदेव स्व.ए.टी.पवार यांच्या स्वप्नातील मतदारसंघ मला घडवायचा आहे. त्यासाठी माझे प्रयत्न असून अपप्रचाराला बळी पडू नका, विकासकामांना साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार नितीनभाऊ पवार यांनी जयदर येथील प्रचार सभेत केले.
यावेळी व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, ज्येष्ठ नेते यशवंत गवळी, बाजार समितीचे उपसभापती सोमनाथ पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, बाजार समिती संचालक शीतलकुमार अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहन जाधव, माजी सभापती मधुकर जाधव, लालाजी जाधव, माजी सरपंच रामदास चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शेतकरी नेते देवीदास पवार यांनी सांगितले की, आमदार नितीन पवार यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासात्मक काम उभे केले असून ओतूर, जामशेत धरणाच्या कामाबरोबर रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज या विभागाची अनेक कामे गावागावांत झाली. कळवण तालुक्याच्या आदिवासी व ग्रामीण भागात विकासकामे पूर्ण केली. सुरगाणा तालुक्याचा विकास ज्यांना करता आला नाही ते कळवणकरांना विकासाचे स्वप्न दाखवत दिशाभूल करत आहे. विरोधकांच्या अफवांना बळी पडू नका, विकासकामे करणार्यांना साथ द्या, असे आवाहन शेतकरी नेते देवीदास पवार यांनी केले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत कळवण तालुक्यातील जनतेने विश्वास ठेवल्याने आमदार नितीन पवार यांना काम करण्याची संधी मिळाली, जनतेचा विश्वास सार्थ ठरवला, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवल्याने अनेक विकासाची कामे मार्गी लागली. कळवण तालुक्यातील सर्वसामान्य जनता आमदार नितीन पवार यांच्या पाठीशी असून त्यांना पुन्हा एकदा आशीर्वाद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी केले.
कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार नितीन पवार यांनी पुनद परिसरात नागरिकांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. आमदार नितीन पवार म्हणाले की, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सोसायटीचे सभापती, संचालक व आदिवासी नेतेमंडळी यांनी सुचवलेल्या विविध विकासकामांसाठी मी निधी कमी पडू दिला नाही. सर्व भागातील विकासकामे मार्गी लागली. मागील निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्याचा मी प्रयत्न केला. विरोधकांकडे मते मागायला मुद्दे नाही त्यामुळे ते तालुक्यात अपप्रचार करत फिरत आहेत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता तालुक्याच्या विकासासाठी मला आशीर्वाद द्या, असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले.
यावेळी बाळासाहेब वराडे, रामचंद्र गायकवाड, विजय शिरसाठ, विनोद खैरनार, काशिनाथ गुंजाळ, शंकर निकम, रघुनाथ महाजन, हरिभाऊ वाघ, बापू जगताप, भरत गांगुर्डे, शशी हिरे,राकेश वाघ, रणधीर वाघ, कल्पेश विसावे, राजू पाटील, सोमनाथ सोनवणे, सीताराम जाधव, रमेश पवार, लक्ष्मण पवार, शिवाजी जाधव, शिवाजी चौरे, रमेश अहिरे आदी उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा