Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशनोकरदारांना गुड न्यूज! PF व्याजदरात मोठी वाढ

नोकरदारांना गुड न्यूज! PF व्याजदरात मोठी वाढ

दिल्ली | Delhi

- Advertisement -

नोकरदारांसाठी एक चांगली बातमी आहे. EPFO ने आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आता पीएफ खातेदारांना ८.१५ टक्के व्याजदर मिळणार आहे. (EPF interest rate)

अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या

यापूर्वी मार्चमध्ये २०२१-२२ साठी EPF वरील व्याज ८.१% या नीचांकी पातळीवर घसरला होता. ईपीएफओ अनेक ठिकाणी पीएफ खातेदाराच्या खात्यात जमा केलेली रक्कम गुंतवते आणि या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो (employees’ provident fund)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (सीबीटी) बैठकीत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. CBT ही ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे आणि केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव याचे अध्यक्ष आहेत.

नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; दोन चिमुकल्यासह ५ जणांचा मृत्यू

EPF व्याजदरात वाढ झाल्यामुळे सुमारे ६ कोटी सक्रिय ग्राहकांना फायदा होणार असून यापैकी ७२.७३ लाख हे आर्थिक वर्ष २०२२ मध्ये पेन्शनधारक होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या