Friday, May 3, 2024
Homeजळगावजिनिंगच्या गोडावूनला भीषण आग

जिनिंगच्या गोडावूनला भीषण आग

कासोदा ता, एरंडोल – Erandol – प्रतिनिधी :

येथील भडगाव रोड वरील पद्मावती जिनिंगच्या रुईच्या गाठी असलेल्या गोडाऊनला रात्री 10 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.

- Advertisement -

सदर आगीत जवळपास 1 कोटी ते1 कोटी 10 लाख रुपये किमतीच्या कापसाच्या रुईच्या 503 गाठी जळून खाक झाल्या.

तसेच जिनिंगच्या आवारात जिनिंग सुरू असल्यामुळे गोडाऊन पासून 150 फूट अंतरावर बाराशे क्विंटल कापूस व 277 रूईच्या तयार गाठी आवारात पडून होत्या आग लागल्याबरोबर कासोदा पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली त्यावरून कासोदा पोलीस स्टेशनने फोन करून एरंडोल, भडगाव, धरणगाव व पारोळा येथील अग्निशामक दलाच्या गाड्या ताबडतोब बोलावून आग विझवण्याचा जोरदार प्रयत्न केला परंतु सदर आग सकाळी नऊ वाजेपर्यंत काही प्रमाणात सुरुच होती. नऊ नंतर आग आटोक्यात आणण्यात संबंधितांना यश आले.

याबाबत कासोदा पोलीस स्टेशनला किरण शांताराम पाटील यांच्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली. आग आटोक्यात आणण्यासाठी कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव व त्यांचे सहकारी यांनी रात्रभर जागरण करून सहकार्य केल्याचे जिनिंगचे भागीदार सौ, वैशाली अशोक पाटील व आशिष समदानी यांनी सांगितले.

यात मात्र कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे तसेच आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या