Friday, May 3, 2024
Homeराजकीयएरंडोल तालुक्यात आठ ग्रामपंचायती बिनविरोध

एरंडोल तालुक्यात आठ ग्रामपंचायती बिनविरोध

एरंडोल – Erandol – प्रतिनिधी :

तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवशी रिंगणगाव, टाकरखेडा, उमर्दे, खर्ची बुद्रुक, ताडे, सोनबर्डी,हनुमंत खेडे, धारागिर या 8;ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

- Advertisement -

आधीच्या तीन बिनविरोध ग्रामपंचायती व आताच्या पाच बिनविरोध ग्रामपंचायती मिळून बिनविरोध निवड झालेल्या ग्रामपंचायती संख्या 11 झाली आहे.

आमदार चिमणराव पाटील यांनी केलेल्या बिनविरोध निवडीच्या आव्हानाला ग्रामीण भागातील जनतेने उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याचे दिसून येते.

यात सर्वाधिक जागा शिवसेनेच्या आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वात असल्याचा दावा तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांनी केले जिल्हा परिषद सदस्य नाना भाऊ महाजन यांच्या प्रयत्नांमुळे खर्ची बुद्रुक ग्रामपंचायत बिनविरोध निवड झाली आहे.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे दगडू भगवान माळी, बेबाबाई राजेंद्र मराठे, युवराज सखाराम अहिरे, सुनंदा प्रकाश माळी, आशाबाई विठ्ठल माळी, बापू सुखदेव माळी, शोभा रमेश माळी, पुनम अर्जुन मराठे, योगेश प्रकाश मराठे.

गालापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाच उमेदवार माघारी च्या दिवशी बिनविरोध निवडून आले आहेत त्यात रेखा सतीश चौधरी, शेख परविन बी आरिफ, मोरे दुर्गाबाई लक्ष्मण, मोरे अर्जुन भागवत, जसूबाई उत्तम वाघ या ठिकाणी दोन जागांसाठी निवडणूक होत आहे निपाणे ग्रामपंचायत निवडणुकीत नीलिमा समाधान ठाकूर या बिनविरोध निवडून आले आहेत उर्वरित आठ जागांसाठी निवडणूक होत आहे.

खर्ची खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत तीन उमेदवार विजयी झाले असून त्यात चंद्रदीप संजय पाटील, जयश्री अजबसिंह पाटील, सगुणा भाऊराव शिंदे, यांचा समावेश आहे चार जागांसाठी निवडणूक होत आहे.

भातखेडे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक चार मधून जयाबाई देवीदास पाटील या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

जळू येथील विमल सोमा भील,कासोदा येथील नाजिम अली सैयद हे बिनविरोध निवडून आले आहे. सकाळपासूनच माघार घेणार्‍या मी उमेदवार वाचकांनी तहसीलदार कार्यालयात आवारात एकदमच गर्दी केली बावीस टेबलांवर 37 ग्रामपंचायतीचे निवडणुकीसंदर्भात कामकाज चालले यावेळी तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार एस पी शिरसाट यांच्यासह सर्व अधिकारी कामकाज पाहत आहेत.

यावेळी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव पोलिस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला आता आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने एकोणतीस ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे याच्यासह अनेक ग्रामपंचायतीमध्ये काही सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या