Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या...सरकार पडणार नाही; छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का

…सरकार पडणार नाही; छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का

नाशिक | Nashik

महाराष्ट्राच्या राजगादीचा निर्णय न्यायालयाच्या दरबारात प्रलंबित असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता कायम राहील की काहीतरी वेगळेच घडेल याविषयी राजकीय वर्तुळातून अनेक मतमतांतरे समोर येत आहेत.

- Advertisement -

काहीच्या मते, जर ‘ते’ 16 आमदार अपात्र झाले तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यमंत्रिपद जाऊ शकते, आणि त्यांचे मुख्यमंत्री पद गेले तर सरकारचे काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मात्र एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद गेले तरी सरकार पडणार नाही, कारण त्यांना 165 आमदारांचा पाठिंबा असणार आहे, असं महत्त्वाचं वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 16 आमदारांचा विषय चांगलाच चर्चिला जात आहे. अनेकवेळा सुनावणी होऊनही 16 आमदारांच्या अपात्रतेचा तिढा सुटलेला नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राडा, तोडफोड, घोषणाबाजी.., काय आहे प्रकार?

त्यातच काल अमरावती येथे शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीबाबत (Mahavikas Aaghadi) महत्त्वाचं वक्तव्य केल्यानंतर राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तत्पूर्वी जळगाव दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरत या सरकारचे डेथ वॉरंट काढल्याचे बोलले होते.

त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसांत हे सरकार कोसळणार असल्याचे ते म्हणाले होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही येत्या पंधरा दिवसात दोन राजकीय स्फोट होणार असल्याचे भाकीत केले आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.

Hapus Mango : अस्सल ‘हापूस’ आंबा नेमका ओळखायचा तरी कसा? जाणून घ्या उपयुक्त टिप्स

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज नाशिक (Nashik) मध्ये असताना त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, संजय राऊत संपादक आहेत, ते दिल्लीमध्ये काम करत असतात.

Sharad Pawar : शरद पवारांचा ‘त्या’ विधानावरून यू टर्न? म्हणाले, माझ्या वक्तव्याचा…

त्यामुळे त्यांच्याकडे माहिती असेल. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून 16 आमदारांबाबत जी केस सुरु आहे. त्याबाबत जर हे 16 आमदार अपात्र झाले तर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊ शकते. असे बोलले जात आहे, मात्र एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद गेले तरी सरकार पडणार नाही, कारण त्यांना 165 आमदारांचा पाठिंबा आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

16 आमदार अपात्र झाले तरी बहुमताचा आकडा त्यांच्याकडे असल्याने सरकार पडणार नाही असे समीकरण माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले आहे. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात, त्यामुळे राजकीय वर्तुळात आता पुन्हा नव्या चर्चा रंगण्याची शक्यता बोलली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या