Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedपंतप्रधान मोदीही माझे राजकारण संपवू शकत नाहीत! 

पंतप्रधान मोदीही माझे राजकारण संपवू शकत नाहीत! 

औरंगाबाद – aurangabad

‘पंतप्रधान मोदीही (Prime Minister) माझे राजकारण संपवू शकत नाहीत’, असे वादग्रस्त विधान करून पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा चर्चेत आल्या आहेत. भाजपाच्या (bjp) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी एका खासगी कार्यक्रमात बोलताना केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंकजांच्या या विधानावरून आता आश्चर्य व्यक्त केले जात असून नरेंद्र मोदींनी देशातील बंशवाद संपवला असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. या विधानामुळे आता चर्चेला तोंड फुटले आहे. पंकजा मुंडे यांना यापूर्वीही अशा वादग्रस्त विधानांमुळे मोठे राजकीय नुकसान सहन करावे लागले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवड्यानिमित्त अंबाजोगाई (Ambajogai) (जि. बीड) येथे आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडेंची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा रंगत आहे. मोदींना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी देखील वंशबादाचे प्रतिक आहे, पण मला कोणी संपवू शकणार नाही मोदीजी पण, जर तुमच्या मनात मी राज्य केले असेल तर. तुमच्यामुळे जर मी काही चांगले करू शकले तर. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला राजकारणात स्वच्छता आणायची आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. कारण फडणवीस सरकार गेल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर भाजपने पाठवले नाही. तसेच आता महाविकास आघाडीचे सरकार येऊन शिंदे-फडणवीसांचे सरकार सत्तेत असतानाही त्यांना डावलण्यात आल्याने त्या नाराज आहेत. पण भाजपने त्यांना पक्षांतर्गत मोठी जबाबदारी सोपवली आहे. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवरच त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ पंकजा मुंडे देखील राष्ट्रवादीत दाखल होतील की काय अशा चर्चाही मध्यंतरी रंगल्या होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या