Friday, May 3, 2024
Homeनाशिकमाजी स्वच्छता कर्मचाऱ्याचे अपघाती निधन; बॅरीकेटिंगचा दोरखंड न दिसल्याने घडली घटना

माजी स्वच्छता कर्मचाऱ्याचे अपघाती निधन; बॅरीकेटिंगचा दोरखंड न दिसल्याने घडली घटना

पंचवटी/नाशिक | प्रतिनिधी 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन सुरु आहे. याकाळात शहरात येणार मुख्य रस्ते पोलिसांनी बॅरीकेटिंग करून बंद केले आहेत. तर काही रस्त्यांवर बॅरीकेटिंगनसल्याने दोरखंड बांधण्यात आले आहेत. आज सकाळी दोन बॅरीकेटिंगला लावलेला दोरखंड न दिसल्याने माजी स्वच्छता कर्मचाऱ्याचा अपघात झाला. या अपघातात हा कर्मचारी जागीच ठार झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे. पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  किशोर चव्हाण (वय ५८) हे पत्नी राजुबेन चव्हाण (वय ५२) यांना रविवार कारंजा येथे सोडण्यासाठी जात होते. त्यांच्या पत्नी राजुबेन या महापालिकेत स्वच्छता कर्मचारी आहेत. त्यांना सोडण्यासाठी जात असताना पेठ रोडवरील शनीचौकात दुचाकी आल्यावर त्यांना बॅरीकेटिंग केलेला दोर नजरेस पडला नाही.

तसेच चव्हाण यांनी डोक्यान हेल्मेटदेखील घातले नसल्याची माहिती बंदोबस्तावर आलेल्या पोलीस हवालदरांनी सांगितले.  यावेळी दुचाकी चालविताना काळजी न घेतल्याने अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर रस्त्यावरील दोरखंड न दिसल्याने अपघात झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

या अपघातात सफाई कर्मचारी किशोर चव्हाण वय 53 हा जागीच ठार झाला, तर त्याची पत्नी बेशुद्ध झाली होती. त्यांना रिक्षातून संजीवनी हॉस्पिटल येथे व नंतर शहरातील सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या