Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजCM अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर; पण मुक्काम जेलमध्येच

CM अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर; पण मुक्काम जेलमध्येच

दिल्ली । Delhi

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांना कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात (Delhi Liquory Policy Case) सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

- Advertisement -

कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात करण्यात आलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका केजरीवाल यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली होती. यावर आज निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना मोठा दिलासा देत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

नक्की वाचा – विधान परिषदेच्या निवडणुकीआधी बड्या नेत्याचा दावा; म्हणाले, “आमचे तीन ते चार आमदार फुटणार”

मात्र अरविंद केजरीवाल यांची ईडीकडून करण्यात आलेली अटक योग्य आहे की अयोग्य यावर सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नाही. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर देखील केजरीवाल तुरुंगातून बाहेर येणार नाही. याच कारण म्हणजे सीबीआयकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की, केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेत उपस्थित केलेल्या काही कायदेशीर प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या पीठाने विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मोठ्या पीठाकडे हे प्रकरण पाठवताना न्यायालयाने केजरीवाल यांची अंतरिम जामिनावर सुटका करणे योग्य असल्याचे मानले आहे. जगण्याच्या अधिकाराचा विचार करून आणि हे प्रकरण मोठ्या पीठाकडे पाठवण्यात येत असल्याने, आम्ही अरविंद केजरीवाल यांची अंतरिम जामीनावर मुक्तता करण्याचे निर्देश देतो, असा आदेश न्यायालयाने दिला.

हे देखील वाचा :  उभ्या असलेल्या कंटेनरवर कार जाऊन धडकल्याने भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे आम आदमी पक्षाने स्वागत केले आहे. अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आपकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. सत्यमेव जयते असे म्हणत आपने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या