Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामनपा निवडणुकीचा खर्च वाढणार

मनपा निवडणुकीचा खर्च वाढणार

नाशिक । फारूक पठाण Nashik

नाशिक महानगरपालिका Nashik Municipal Corporation सार्वत्रिक निवडणूक 2022 NMC Election -2022 साठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मागच्या वेळी 2017 साली झालेल्या निवडणुकीसाठी सुमारे साडेसात कोटी रुपये खर्च आले होते. 5 वर्षात मोठ्या प्रमाणात महागाई वाढल्याने यंदा 10 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त खर्च येऊ शकतो असा अंदाज आहे.

- Advertisement -

दर दहा वर्षांनी होणारी जनगणना करोनामुळे यंदा झाली नाही. यामुळे 2011 च्या जनगणनेनुसार सुमारे 14 लाख 86 हजार लोकसंख्या घेऊन प्रभागाचा कच्चा आराखडा तयार होत आहे. दरम्यान, मागील दहा वर्षात नाशिक शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. त्याचप्रमाणे विविध मोकळ्या ठिकाणी भव्य इमारती उभ्या राहून त्यात लोक राहायला आले आहेत. यामुळे यंदा लोकसंख्या कमी व मतदार संख्या जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदा त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार आहे. यामुळे एका प्रभागात साधारण छत्तीस हजार मतदार संख्या राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 43 प्रभाग 3 चे राहणार असून एक प्रभाग चार सदस्यीय राहणार आहे. 122 वरून आता 133 नगरसेवक निवडून येणार आहेत. महापालिका निवडणूक विभागाने विविध प्रकारचे नियोजन सुरू केले आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारूप कच्चा आराखडा तयार केला असून तो महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे सादर केला आहे. आयुक्तांमार्फत या आराखड्याची छाननी केल्यानंतर 29 नोव्हेंबरपर्यंत तो राज्य निवडणूक आयोगाकडे जाणार आहे.

प्रारूप प्रभागरचनेचा कच्चा आराखडा पेन ड्राईव्हमध्ये सील करून राज्य निवडणूक आयोगाला गोपनियरित्या सादर केला जाणार आहे. त्यात प्रगणक गट, प्रभाग दर्शवणार्‍या केएमएल फाईल, सर्व प्रभाग, त्यामध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्येचे विवरण असणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने 2021मधील महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येनुसार सदस्यसंख्या निश्चित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिक महापालिका क्षेत्रात 11 सदस्य वाढणार असल्याने प्रारूप प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करताना प्रशासनाला पुन्हा काही बदल करावे लागले होते. नाशिक महापालिका क्षेत्रात आता तीन सदस्यीय 43 तर चार सदस्यीय 1 अशा प्रकारे 44 प्रभाग अस्तित्वात येणार आहेत.

1400 पेक्षा जास्त बूथ

2017 साली झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीच्या वेळी 1410 मतदान बुथ तयार करण्यात आले होते. त्या एका बूथवर साधारण आठशे मतदार संख्या होती. आता 2022 साली होणार्‍या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकसंख्या व मतदार संख्या देखील वाढणार आहे. यामुळे नव्याने मतदान बूथ तयार करण्याची वेळ येणार आहे. महापालिका प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम झाल्यानंतर तसेच मतदार पुनरिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळी अंतिम मतदार यादी जाहीर होईल, त्यानुसार नियोजन करण्यात येईल व यानंतरच मतदान यंत्राची मागणीदेखील काढण्यात येणार आहे.

7 हजार पेक्षा अधिक सेवक लागणार

नाशिक महापालिका निवडणुकीत एका मतदान बुथवर साधारण पाच अधिकारी, सेवक लागतात. यानुसार सुमारे दिड हजार मतदान बूथ जरी धरले तर 7 हजार पेक्षा जास्त अधिकारी, सेवक निवडणूक प्रक्रियेसाठी लागणार आहेत. दरम्यान, मतदान केंद्रांवर विविध प्रकारच्या सुविधा मिळणार आहे. यामध्ये उन्हापासून बचाव करण्यासाठी शामियाना, पिण्यासाठी पाणी आदींचा समावेश असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या