Sunday, May 19, 2024
Homeनाशिकसामोपचार कर्ज परतफेड योजनेला मुदतवाढ

सामोपचार कर्ज परतफेड योजनेला मुदतवाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तीन महिन्यांपूर्वी थकबाकीदारासांठी सुरू केलेल्या आकर्षक सामोपचार कर्ज परतफेड योजनेला चांगला प्रतिसाद लाभला असून ८८५ सभासदांनी याचा लाभ घेतला आहे.

- Advertisement -

बँक सभासदांचा प्रतिसाद बघता संचालक मंडळाने या योजनेला एक महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ आॅक्टोंबर २०२० पर्यंत ही योजना सुरू असणार असून, या योजनेचा सभासादांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी केले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक डबघाईतून बाहेर काढण्यासाठी वसुली मोहिम हाती घेतली.

यात वसुलीसाठी बँकेने थकबाकीदारांकडे पुन्हा मोर्चा वळवित, थकबाकीदारासांठी आकर्षक सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० जाहीर केली होती. या योजनेत सहभागी होणाऱ्या थकबाकीदारांना एकूण थकबाकीवर आकारण्यात येत असलेल्या व्याजावर ५० टक्के सवलत दिलेली आहे.थकबाकीच्या अनुषंगाने ७५ हजार ते साडेचार लाखापर्यंत सवलत थकबाकीदारांना मिळणार आहे.

ही योजना १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२० या तीन महिन्यांच्या कालावधी लागू करण्यात आली होती. ३० सप्टेंबरपर्यंत सामोपचार योजनेत ८८५ सभासादांनी भाग घेऊन योजनेचा लाभ घेतला. सदरची सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० ही योजना दिनाक ३० सप्टेंबर २०२० या कालावधी पर्यंत लागू होती. परतू संस्थाची व सभासदांचा प्रतिसाद व मागणी विचारात घेता बँकेच्या संचालक मंडळाने सदर योजनेस एक महिन्याची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

३१ आॅक्टोबर २०२० पर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त योजनेस पात्र थकबाकीदार सभासदांनी या योजनेत भाग घेऊन कर्ज परतफेड करताना भरघोस सवलतीचा लाभ घेऊन पुनश्च कर्ज मिळवण्यासाठी पात्र व्हावे व बँकेस व संस्थेस सहकार्य करावे , असे आवाहन बँकेचे अध्यक्ष केदा आहेर व संचालक मंडळाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या