Thursday, May 2, 2024
Homeजळगावरेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ

रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ

भुसावळ Bhusawal – प्रतिनिधी

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन (Central Railway) मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak terminus) आणि थिवि (thivi) तसेच मुंबई (Mumbai)आणि मनमाड (Manmad) दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या ( summer special train) चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

मुंबई- थिवि उन्हाळी विशेष (२० फे-या)- 01045 लोकमान्य टिळक टर्मिनस – थिवि उन्हाळी विशेष ट्रेनला दि. ६ ते २४ मे (१० फे-या) पर्यंत एक दिवसाआड चालविण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्र. 01046 थिवि (THIVI) – लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) उन्हाळी विशेष ट्रेनला दि. ७ ते २५ हे (१० फे-या) पर्यंत एक दिवसाआड चालविण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई – मनमाड उन्हाळी विशेष (९२ फेऱ्या) – 02101 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – मनमाड दैनिक विशेष ट्रेनला दि. १६ मे ते ३०जून (४६ फेऱ्या) पर्यंत चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्र. 02102 मनमाड (MANMAD) – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई (CSMT MUMBAI) दैनिक विशेष ट्रेनला दि. १६ मे ते ३० जून (४६ फेऱ्या) पर्यंत चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

या गाड्यांची वेळा, संरचना आणि थांबे यामध्ये कोणताही बदल होणार नाही. या. विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या