Friday, May 3, 2024
Homeनाशिकहरकतींचा अहवाल सादर करण्यास मुदत वाढ

हरकतींचा अहवाल सादर करण्यास मुदत वाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका 2022 पंचवार्षिक निवडणुकीसाठी( NMC Upcoming Elections ) प्रारुप प्रभाग रचनेवर ( Ward Structure )आलेल्या हरकतींवर( Objections ) सुनावणी होऊन त्याचा अंतिम अहवाल काल राज्य निवडणूक आयोगाकडे ( State Election Commission ) जाणार होता, मात्र आयोगाने याला तीन दिवस मुदतवाढ दिल्याने अहवाल आता पाच मार्च रोजी जाणार आहे.

- Advertisement -

महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे नाशिक महापालिका प्रशासनाने 1 फेब्रुवारी रोजी शहरातील एकूण 44 प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करुन त्याच्यावर 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागितल्या होत्या.

23 फेब्रुवारी रोजी त्याच्यावर सुनावणी झाली होती. नाशिक महापालिका प्रभाग प्रारूप रचनेवर हरकती घेण्याच्या कालावधीत एकूण 211 हरकती प्राप्त झाल्या होत्या.त्यांची सुनावणी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सिडकोचे सहसंचालक अश्विनकुमार मुदगल यांची नेमणूक करण्यात आली होती.

23 फेब्रुवारी रोजी मुदगल यांच्यासह राज्य निवडणूक आयोगाचे उपाध्यक्ष अविनाश सणस आदी अधिकार्‍यांनी तसेच महापालिका आयुक्त कैलास जाधव, प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी एकूण 211 तक्रारदारांपैकी 62 तक्रारदार गैरहजर होते.

आचारसंहिता कधी?

महापालिका निवडणुकीसाठी अद्याप आरक्षणाची सोडत झालेली नाही, तर आरक्षण शिवाय प्रारूप प्रभाग रचना जाहीर करून त्याच्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या,त्याची सुनावणी देखील पूर्ण झाली आहे. त्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार याबाबत चर्चांना ऊत आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या