Sunday, May 19, 2024
Homeधुळेनिवृत्त वैद्यकीय अधिकार्‍याकडे खंडणीची मागणी ; चौघांवर गुन्हा

निवृत्त वैद्यकीय अधिकार्‍याकडे खंडणीची मागणी ; चौघांवर गुन्हा

धुळे । प्रतिनिधी dhule

निवृत्त वैद्यकिय अधिकार्‍याचे घर खाली करून देण्यासाठी त्यांच्याकडे दहा लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा नोंद झाला आहे. साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे येथे राहणारे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार रतनलाल भटनागर (वय 71) यांनी देवपूर पोलिसात तक्रार दिली आहे.

- Advertisement -

त्यानुसार त्यांनी दाखल केलेल्या खटल्यामध्ये तडजोड करण्यासाठी त्यांना विलास निंबाजी शिंदेसह चौघांनी देवपूरातील न्यु एकता हौसिंग सोसायटीतील प्लॉट क्र. 51 येथे बोलविले. तेथे विलास शिंदे, त्याची पत्नी प्रतिभा शिंदे व मुलगा भुषण शिंदे यांनी फिर्यादीच्या मालकीचे घर आमच्या नावावर करून द्या किंवा दहा लाख रूपये द्या, तेव्हाच तुमचे घर खाली करेल, अशी धमकी दिली. दरम्यान सन 2012 ते 2019 मध्ये फिर्यादी यांनी खंडणीस्वरूपात आठ लाख रूपये धमक्यांना घाबरून दिले आहेत. सहा महिन्यात घर खाली करून देतो, असे संशयित आरोपींनी सांगितले होते. मात्र अद्याप घर खाली केले नाही. म्हणून वरील तिघे व शिवाजी भाईदास देसले (रा. देवपूर) अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला असून पीएसआय आर.एम.जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या