Friday, May 3, 2024
Homeनाशिकविळख्यातले त्र्यंबक (भाग ०४) : सावकारकीतून त्र्यंबकवाशियांची पिळवणुक

विळख्यातले त्र्यंबक (भाग ०४) : सावकारकीतून त्र्यंबकवाशियांची पिळवणुक

नाशिक । Nashik

त्र्यंबकेश्वरमध्ये मुळात जागा कमी असल्याने उपलब्ध जागा आपणास मिळावी, मोक्याच्या शासकीय जागा पटकावण्यासाठी बड्या धेंडांची चढाओढ चालल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

उत्पन्नाचे वाढलेले स्त्रोत यातून त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात सावकारकी फोफावली असून त्यांच्याकडून सर्वसामान्यांची पिळवणुक सुरू आहे. तर या सावकारांचा पैसा गुंतवणुकीसाठी जमीनी जागा मिळवण्यासाठी भूमाफिया पुढे सरसरावल्याचे चित्र आहे.

त्र्यबंकेश्वरची लोकसंख्या 18 ते 20 हजार दरम्यान आहे. तर त्र्यंबेश्वर दर्शन , नारायण नागबळी, कालसर्प निवारण या पुजा करण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दररोज सरासरी वीस ते पंचवीस हजार भाविक येत असतात. त्यांचा हा ओघ श्रावण महिन्यात लाखोच्या घरात जातो. या सर्वांकडून होणारी खरेदी, जेवण, हॉटेलिंग, राहण्याची व्यवस्था, पान फुले, नारळ यातून दिवसेंदिवस लाखो रूपयांची उलाढाल त्र्यंबकेश्वरमध्ये होत आहे.

यातूनच अनेक घराणी पुढे आली असून सहज उपलब्ध झालेल्या पैशांची गुंतवणुक व व्यवस्था लावण्यासाठी सावकारकीचे व्यावसाय सुरू झाले आहेत. त्र्यंबकेश्वर बरोबरच नाशिक तसेच मुंबईपर्यंत ही सावकारकी चालत असल्याचे बोलेले जात आहे. सावकारांनी दिलेल्या पैशांची वसुली करणे, त्यांना मोक्याच्या अधिकृत, अनाधिकृत जागा घेऊन देणे, रिसॉर्टसाठी जागा खरेदी करणे यातूनच भूमाफियागिरी सुरू झाली आहे.

सुरूवातील बाहेरील धनदांडग्यांचे, व्यावसायिकांचे एजंट म्हणुन काम पाहणार्‍या या भू माफियांनी यातील पैसा पाहुण आपल्याच टोळ्या तयार केल्या आहेत. यांची दहशत त्र्यंबकेश्वरमध्ये वाढत चालली आहे. यांचा वापर करून गरीब व्यावसायिकांना धाक दाखवून जागा बळकावल्या जात आहेत.

तसेच नगरपालिका व सरकारी जागांवर अतिक्रमण करून अनाधिकृत बांधकाम बांधून त्या बळकवण्यासाठी अधिकार्‍यांना पैसे चारून कसेही व्यवहार केले जात असल्याचे सर्वसामान्य नागरीक बोलत आहेत.

त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक विधीसाठी चार दिवस भाविक राहात असल्याने लॉजिंग बोर्डींगच्या व्यावसायाला सुगिचे दिवस आले आहेत. यामुळे पोलीस, नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता राहत्या घरांचा व्यावसायिक वापर सुरू करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या वतीने विविध वस्तुंच्या विक्रीसाठी गाळे तयार करण्यात आलेले आहेत.

हे गाळे मुळ लाभार्थी सोडून सबंधीत नगरसेवक, त्यांच्या नातेवाईकांनी नाममात्र भाडे तत्वावर मिळवले आहेत. या गाळ्यामध्ये पोटभाडेकरू टाकून त्यांच्याकडून हजारो रूपये दरमहा मिळवले जात आहेत. अशा गाळ्यांचे भाडे दिवसासाठी 50 ते 60 हजाराच्या जवळ असल्याचे नागरीक सांगतात.

या पुढील पायरी म्हणुन नगरपालिकेच्या इमारती, शासकीय इमारती सामाजिक संस्था, तसेच इतर कारणे पुढे करून त्यातील काही खोल्या मिळवायच्या व पुढे त्यातच अवैध मद्यविक्री, बार, जुगार, अनैतिक व्यावसाय सुरू केल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

नगरसेवकपदासाठी कोट्यवधीचा धुराळा

त्र्यंबकेश्वर देवस्थानामुळे तसेच भाविकांची संख्या पाहता या ठिकाणी इंग्रज शासन कालावधीतच छोटे गाव असतानाही त्र्यंबकेश्वरला नगरपालिका झाली आहे. काही वर्षांपुर्वी आपले व्यवसाय भले आणि आपण भले असे म्हणत राजकारणापासून दूर राहणारे आता नगरसेवक पदासाठी काहीही करण्यास तयार आहेत.

19 नगरसेवकांच्या निवडणुकांसाठी या ठिकाणी दर पाच वर्षात कोट्यवधी रूपयांचा धुराळा होतो. प्रत्येक नगरसेवक लाखो ते कोटीच्या घरात खर्च करत मत विकत घेताना दिसतात. तर निवडणुक येताच मतासाठी जोडलेले हात याच त्र्यंबकवाशियांची लूट करण्यासाठी पुन्हा पाच वर्षे मोकळे होतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या