Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशTwitter नंतर आता Meta च्या कर्मचाऱ्यांवर कपातीची टांगती तलवार

Twitter नंतर आता Meta च्या कर्मचाऱ्यांवर कपातीची टांगती तलवार

दिल्ली | Delhi

- Advertisement -

ट्विटरने ५० टक्के कर्मचारी कपात केल्यानंतर आता फेसबुकची पॅरेंट कंपनी ‘मेटा’ने आता मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची तयारी केली आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मेटाचे जगभरात जवळपास ८७ हजार कर्मचारी आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपसह विविध प्लॅटफॉर्म्सवर हे कर्मचारी कार्यरत आहेत. या सोशल मीडिया कंपनीने जून महिन्यात अभियंत्यांच्या भरतीमध्ये ३० टक्क्यांनी कपात केली होती.

का होणार कर्मचाऱ्यांची कपात?

जगभरात मेटा कंपनीचे प्रोडक्ट्स मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. यामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचा समावेश आहे. परंतु इंटरनेटला एका नवीन स्तरावर नेण्याच्या प्रयत्नात कंपनीला मेटाव्हर्स व्यवसायावर बरीच गुंतवणूक करावी लागली आहे. आतापर्यंत गुंतवणुकीनुसार परतावा मिळण्यास सुरुवात झालेली नाही.

अशा परिस्थितीत कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी धडपडत आहे. दुसरीकडे, अमेरिकेच्या शेअर बाजारातील तीव्र मंदीमुळे मेटा कंपनीचे शेअर्सही खूप घसरले आहेत. या वर्षी कंपनीचे शेअर्स जवळपास ७३ टक्क्यांनी घसरले आहेत. मार्क झुकरबर्गच्या संपत्तीतही अशीच घसरण नोंदवण्यात आली आहे.

दम्यान एलॉन मस्क यांनी ट्विटरचे मालकी हक्क मिळताच जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. ट्विटरने गेल्या आठवड्यात जवळपास साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. या कपातीमध्ये भारतातील २३० पैकी १८० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांची कपात ट्विटरच्या सर्वच विभागांमध्ये करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या