Tuesday, December 3, 2024
Homeक्राईमखरवंडीतून बनावट दारू बनवणार्‍या दोघांना अटक

खरवंडीतून बनावट दारू बनवणार्‍या दोघांना अटक

पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाची पाथर्डी तालुक्यात कारवाई

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बनावट दारू बनवणार्‍या दोघांना पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार शिवारातून अटक केली आहे. बाळू बहिरवाल (वय 28) रा. घोसापुरे जि. बीड व हरिदास सपकाळ (वय 48 ) रा. अवलपुर जि. बीड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत.

- Advertisement -

या कारवाईत चारचाकी कारसह साडे सहा लाखांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. तालुक्यातील पूर्व भागात पुन्हा एकदा बनावट दारूचा सुळसुळाट वाढला असून या कारवाईमुळे बनावट दारू विकणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागीय भरारी पथकातील पोलीस निरीक्षक नरेंद्र थोरात यांचा पथकाला संशयतरीत्या बनवट दारू घेऊन जाणारी हुंडाई कंपनीची कार खरवंडी कासार शिवारातील राष्ट्रीय महामार्ग कल्याण-निर्मल (विशाखपट्टणम) वरून भगवानगडाकडे जाणार्‍या चौकामध्ये आढळून आली.

या गाडीमध्ये बनावट विदेशी दारूच्या तयार केलेल्या विविध ब्रँडच्या गोण्यांमध्ये आढळून आल्या. या आरोपींकडून अधिकची चौकशी केली असता ही बनवतारू बीड जिल्ह्यातील घोसापुरी शिवारात एका नाल्याच्या बाजूला झाडाझुडपामध्ये तयार दारू करण्याचा उद्योग सुरू होता. त्या ठिकाणाहूनही सात विदेशी दारूचे बॉक्स पथकाने जप्त केले. या कारवाईत 180 मिलीच्या 593 तर 750 मिलीच्या 50 विविध प्रकारच्या विदेशी बनावट दारूच्या बाटल्या त्याचप्रमाणे रिकाम्या बाटल्या अनेक दारूच्या ब्रँडचे 895 बाटल्यांचे झाकणे, बनावट दारू तयार करण्याचे इतर साहित्य, कार असा एकूण 6 लाख 54 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोवा येथून दारू आणून ती बनावट पद्धतीने बाटल्यांमध्ये भरण्याचा उद्योग सुरू होता. त्यामुळे लाखो रुपयांचा महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडत होताच त्याप्रमाणे ही दारू माणसाच्या जीवितहानी कारणीभूत ठरत असल्याचं या भरारी पथकाने यावेळी सांगितले. प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वयाने विविध कलमांतर्गत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय कार्यालयाकडे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात, दुय्यम निरीक्षक विराज माने, धिरज सस्ते, आर. ए. घोरपडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जे. एच. क्षिरसागर, एस. एस. पोंधे, पी. टी. कदम, आर.जे. चव्हाण, ए. आर. थोरात, एस. सी. भाट, ए. आर. दळवी, आर. टी. तारळकर, एन. आर. ठोकळ व एस. व्ही. बिटके यांनी ही कारवाई केली आहे. तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक धिरज सस्ते करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या