Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्हाधिकार्‍यांच्या नावाने फेक मॅसेज व्हायरल

जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने फेक मॅसेज व्हायरल

नाशिक । Nashik

दैनंदिन जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी बाहेर जाऊ नका, एकाच वेळी दहा ते पंधरा दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू साठवूण ठेवा, वर्तमान पत्रांना हात लावू नका, असे खोट्या आशयाचे व भिती निर्माण करणारे मॅसेज जिल्हाधिकार्‍यांचा संदेश नावाने सोशल मीडियावर फिरत असून नाशिककरांनी त्याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

- Advertisement -

‘कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयांच्या नावाने नाशिकसह विभागातील अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार या जिल्ह्यांत व्हाट्स ॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटक व खोडसाळ प्रवृत्तीचे लोक पसरवत आहेत.

लवकरच करोनाचा समूह संसर्गाला सुरुवात झाली असून आपण सगळ्यांनीच आता अतिदक्षता पाळायची आहे. त्यात प्रामुख्याने शेजारी जाणे बंद करा, गरम पाणी पिणे, ब्रेड पाव बेकरी सामान बंद करा, बाहेरील व्यक्तीला घरात घेऊ नये, कामवाली बाईला भरपगारी सुट्टी देऊन टाका,

पुढील पंधरा वीस दिवसांसाठी गरज लागेल एवढे सामान भरून ठेवा, अगदीच गरज असेल तरच बाहेर जाऊन सामान आणा, ट्रेन बसने प्रवास करणे टाळावे, ज्यांना सुट्टी घेणं शक्य आहे.त्यांनी घरून काम करावे असे सूचना देणारे खोटे संदेश पसरवले जात आहेत.

दुधाच्या पिशव्या, वर्तमानपत्रे या वस्तूंच्या माध्यमातून करोनाचा विषाणू पसरण्याची शक्यता नाही. त्यामुळे सोशल मीडियातील अफवांवर विश्वास ठेवू नका. कोरोना केवळ बाधित व्यक्तींच्या संपर्कातून होतो. अफवांकडे दुर्लक्ष करा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

वर्तमानपत्रातून जनजागृती

वाचन ही आपली समृद्ध संस्कृती आहे. ती वर्तमानपत्राच्या माध्यमातून जपण्याचे कार्य सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर आपण करत आलो आहोत. ही संस्कृती जपण्याचे आणि वृद्धींगत करण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे.

वृत्तपत्र ही आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन जगण्याचा, भविष्याची दिशा ठरवण्याचा अविभाज्य घटक आहे. ‘माझे कुटुंब व माझी जबाबदारी’ च्या मोहिमेत आपण जबाबदार कुटुंबाचे घटक म्हणून वृत्तपत्र वाचून वाचन संस्कृती बळकट करूया, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या