Thursday, May 2, 2024
Homeनाशिककथित सर्पमित्रांचे गैरप्रकार रोखणार

कथित सर्पमित्रांचे गैरप्रकार रोखणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वयंघोषित व कथित सर्पमित्रांकडून (Snake friend) वन्यजीवांना डांबून ठेवणे, सर्पांसोबत स्टंटबाजी करणे, सर्प रेस्क्यू केल्यानंतर अव्वाच्या सव्वा रकमेची मागणी नागरिकांकडून करणे, असे विविध गैरप्रकार व गैरमार्ग अवलंबवण्याचा प्रयत्न अनेकदा समोर येतो. कथित सर्पमित्रांचा गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यस्तरीय सर्पमित्र आघाडी प्रयत्नशील असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

नाशिक (Nashik) शहरातील शासकीय विश्रामगृह येथे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी जिल्हाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र सेना सर्पमित्र आघाडीच्या वतीने बैठक घेण्यात आली.

या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्पमित्रांनी व्यथा व त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाचा पाढा वाचला. तसेच शासनाकडून वनविभागामार्फत (Forest Department) सर्पमित्रांना अधिकृत करून मानधन सुरू करण्यात यावे, अशी मागणी (Demand) यावेळी करण्यात आली.

यावेळी तायडे यांनी सर्पमित्रांतर्फे वनविभागाला निवेदन देणार असून प्रत्येक जिल्ह्यात वनविभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन संघटनेचे सभासद असलेल्या सर्पमित्रांची यादी सादर केली जाणार आहे. तसेच यासोबत सर्पमित्रांची व्यथा व मागण्यांचे निवेदनही देणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सर्पांना कायद्याचे बळकट संरक्षण लाभले आहे. याविषयीचे पालन करत समाजात जागृती करणार असल्याचे जाधव यांनी शेवटी सांगितले. जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या सर्पमित्रांना उत्तर महाराष्ट्राचे अशोक बतायडे, मराठवाडा अध्यक्ष अभिलाष जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी गणेश गाडेकर, चंद्रकांत पाटील, अमित घायवटे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या