मुंबई | Mumbai
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या या आत्महत्येमुळे मराठीसह हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ते ५८ वर्षांचे होते….
नितीन देसाई यांचा जन्म दापोली (Dapoli) येथे झाला. त्यामुळे त्यांची कोकणातील खेडेगावाच्या मातीशी नाळ जुळलेली होती. देसाई यांचे शालेय शिक्षण मुलुंड (Mulund) येथील वामनराव मुरंजन हायस्कूलमध्ये मराठी माध्यमात झाले होते. यानंतर त्यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि एलएस रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फोटोग्राफीचे शिक्षण घेतले.
Haryana Violence : हरियाणात दुसऱ्या दिवशीही हिंसाचार, मृतांचा आकडा वाढला; ‘त्या’ व्हिडीओमुळे तणावजन्य स्थिती?
त्यानंतर १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचे काम सुरू केले. यानंतर २००५ साली त्यांनी कर्जतमध्ये एन.डी.स्टुडिओ उभा केला होता. नितीन देसाई यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये, इतिहासकालीन मालिकांमध्ये कला दिग्दर्शनाचे काम केले होते. यात सनम (१९९९), लगान (२००१), देवदास (२००२), जोधा अकबर (२००८) आणि प्रेम रतन धन पायो (२०१५), ‘परिंदा’, ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’, ‘आ गले लग जा’, ‘सलाम बॉम्बे’, अशा सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे.
डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे तरुणीने संपवली जीवनयात्रा
तसेच नितीन देसाई यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या बड्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. तसेच ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘देवदास’ या चित्रपटांसाठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. तर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
सुप्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या
दरम्यान, देसाई यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. तर कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी जोधा अकबर, ट्रॅफिक सिग्नल आणि कलर्सचा रिअॅलिटी शो बिग बॉस यासारखे होस्ट केले.