मुंबई | Mumbai
दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवार (दि.१८) रोजी सोलापुरातील (Solapur) प्रसिद्ध न्युरो फिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली होती. त्यामुळे वैद्यकीत क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. यावेळी वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. या चिठ्ठीत एका महिलेच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर आता त्या महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने (Manisha Musale-Mane) या महिलेच्या विरोधात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयाची परवानगी घेत सदर महिलेला अटक (Arrested) केली आहे.
चिठ्ठीत नेमकं काय लिहिले होते?
ज्या महिलेला आपण आयुष्यात उभे केलं, हॉस्पिटलची (Hospital) प्रशासकीय सूत्र हातात दिली. त्याच महिलेने आपल्यावरती घाणेरडे आरोप केले. हे सहन होत नसल्यामुळे आपण आपले जीवन संपवत असल्याचे डॉ. शिरीष वळसंगकरांनी चिठ्ठीत म्हटले होते.
वळसंगकर तणावाखाली असल्याची चर्चा
डॉ. शिरीष वळसंगकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्रांवरती हवे होते. त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता, पण रूग्णांकडून येणारे बिल ही कोणतीही नोंद न करता स्विकारली जात होती. ही गोष्ट वळसंगकरांना खटकल्याने त्यांनी ही रक्कम स्विकारणाऱ्या महिलेला कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यावर आत्महत्या करण्याची धमकी वळसंगकरांना दिली होती. तिच्या धमकीवरून वळसंगकरांना पोलिसांत (Police) तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ते त्यांना मान्य नव्हते. या प्रकरणामुळे डॉ. शिरीष वळसंगकर तणावाखाली असल्याचे बोलले जाते.