Tuesday, March 25, 2025
HomeमनोरंजनTollywood मधील प्रसिद्ध कलाकार जयप्रकाश रेड्डी यांचे निधन

Tollywood मधील प्रसिद्ध कलाकार जयप्रकाश रेड्डी यांचे निधन

दिल्ली Delhi

Tollywood मधील प्रसिद्ध कलाकार जयप्रकाश रेड्डी(Jayaprakash Reddy) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने आंध्रप्रदेश येथील गुंटूर जिल्ह्यात मंगळवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.

- Advertisement -

त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘ब्रह्मपुत्रुडु’ ने केली होती. याशिवाय प्रेमिचुकुंदम रा, गब्बर सिंह, चेन्नाकेशवारेड्डी, सीथाया आणि टेंपर यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. जयप्रकाश रेड्डी अल्लागड्डा जिल्ह्यात राहणारे होते आणि आपल्या रायलसीमावाल्या खास शैलीत बोलण्यासाठी विशेष प्रसिद्ध होते.

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू(andhra pradesh former cm N Chandrababu Naidu) यांनी दुख व्यक्त केले असून आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, “जयप्रकाश रेड्डी गुरू यांच्या निधनामुळे तेलगू सिनेमा आणि थिएटरने त्यांचा एक हिरो गमावला आहे. अनेक दशकं त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांनी अनेक आठवणी दिल्या आहेत. या दुःखद काळात त्यांच्या मित्र- परिवाराला हिंम्मत मिळो.”

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली....