Sunday, May 19, 2024
Homeनंदुरबारजिल्ह्यातील 73 मंडळांकडून आज गणरायाला निरोप

जिल्ह्यातील 73 मंडळांकडून आज गणरायाला निरोप

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar district) यंदा एकूण 860 मंडळांकडून गणरायाची स्थापना (Establishment of Ganaraya) करण्यात आलेली होती काल पाचव्या दिवशी (fifth day) जिल्हाभरात 258 मंडळांकडून (Mandals) गणरायाला निरोप देण्यात आला. यामध्ये 76 सार्वजनिक, 136 खाजगी तर 46 एक गाव एक गणपतींचा समावेश होता. तर उद्या गौरी विसर्जनाच्या (Gauri immersion) दिवशी जिल्ह्यातील 73 मंडळांकडून गणरायाला निरोप (Saying goodbye to Ganaraya) देण्यात येत आहे. यामध्ये 60 सार्वजनिक, 8 खाजगी तर एक गाव एक गणपती असे 5 गणपती मंडळांचा समावेश आहे.

- Advertisement -

शासनाने यंदा गणेशोत्सवासाठी सर्व नियम शिथील करण्यात आल्याने कोरोनानंतर प्रथमच जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यावर्षी जिल्ह्यात 860 मंडळांकडून गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. यात 423 सार्वजनिक, 338 खाजगी व 99 एक गाव एक गणपतींचा समावेश आहे.यामध्ये आठ टप्प्यांमध्ये गणरायाचे विसर्जन करण्यात येते. दीड दिवसाच्या गणपतींमध्ये एका मंडळाकडून गणरायाचे विसर्जन करण्यात आले होते. तिसर्‍या दिवशी चार मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात आला. काल दि.4 सप्टेंबर रोजी पाचव्या दिवशी 258 मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात आला.

यात 76 सार्वजनिक, 136 खाजगी तर 46 एक गाव एक गणपतींचा समावेश आहे. तर उद्या दि.5 रोली जिल्हाभरात एकूण 73 मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. यामध्ये नंदुरबार शहर पोलिस ठाणेंतर्गत 28 सार्वजनिक व 1 खाजगी, उपनगर पोलिस ठाणेंतर्गत 14 सार्वजनिक, 1 खाजगी व 1 एक गाव एक गणपती, नवापूर पोलिस ठाणेंतर्गत 5 खाजगी गणपतींचे विसर्जन करण्यात येणार आहे.

विसरवाडी पोलिस ठाणेंतर्गत 2 सार्वजनिक, म्हसावद पोलिस ठाणेंतर्गत 4 एक गाव एक गणपती, तळोदा पोलिस ठाणेंतर्गत 16 सार्वजनिक तर एक खाजगी मंडळाकडून गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. असे जिल्हाभरात 60 सार्वजनिक, 8 खाजगी तर 5 एक गाव एक गणपतींना निरोप देण्यात येणार आहे.

दरम्यान गणरायाच्या विसर्जनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एक पोलिस अधिक्षक, एक अप्पर पोलिस अधिक्षक, सहा पोलिस उपअधिक्षक, 19 पोलिस उपनिरीक्षक, 61 सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा उपनिरीक्षक, 729 पोलिस अंमलदार, 104 महिला पोलिस अंमलदार, 5 स्ट्रायकिंग फोर्स, दोन आरसीपी, दोन क्यूआरटी, एक एसआरपीएफ कंपनी तर 600 होमगार्ड असा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या