Saturday, September 26, 2026
Homeक्राईमCrime News : फार्महाऊसवर घुसून तलवार, पिस्तुलाच्या धाकाने लूट

Crime News : फार्महाऊसवर घुसून तलवार, पिस्तुलाच्या धाकाने लूट

नेवासा तालुक्यातील व्यक्तीची एमआयडीसी पोलिसात फिर्याद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

घाणेगाव (ता. अहिल्यानगर) शिवारातील एका फार्महाऊसवर घुसून, मॅनेजरच्या डोक्याला पिस्तुल आणि मालकाच्या मानेला तलवार लावून 97 हजार 200 रूपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (13 ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (14 ऑक्टोबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ज्ञानेश्वर उध्दव शिरसाठ (वय 40, रा. कौठा, ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे. राहुल प्रकाश मांढरे (रा. स्वास्थ हॉस्पिटलच्या पाठीमागे, लालटाकी, अहिल्यानगर), मनोज कराळे, ज्युनेद इनामदार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व पाच अनोळखी महिला यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर शिरसाठ यांचे घाणेगाव शिवारात फार्महाऊस आहे. सोमवारी दुपारी राहुल मांढरे, मनोज कराळे, ज्युनेद इनामदार आणि त्यांच्यासोबतच्या पाच अनोळखी महिलांनी फार्महाऊसमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यांनी फार्महाऊसचे मॅनेजर मयुर विलास जाधव यांच्या डोक्याला पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर त्यांच्या खिशातील 2 हजार 200 रूपये रोख, गळ्यातील सुमारे 80 हजार रूपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर संशयित आरोपींनी ज्ञानेश्वर यांच्या मानेला तलवार लावून त्यांना फार्महाऊसवरून हाकलून दिले. जाताना संशयित आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फार्महाऊसमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा डीव्हीआर आणि हार्डडिस्कही चोरून नेली.

याप्रकरणी ज्ञानेश्वर शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून राहुल मांढरेसह इतर संशयित आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोंढे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Trimbakeshwar Simhastha News : त्र्यंबकेश्वरमध्ये तयारीला वेग; सिंहस्थाच्या ध्वजारोहण समारंभास राष्ट्रपती...

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar महाराष्ट्रातील नागा साधूंचे एकमेव कुंभमेळा क्षेत्र आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे मुख्य केंद्र असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे आगामी कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची उत्सुकता...