Friday, June 6, 2025
Homeनाशिकभडाणेत बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू; बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

भडाणेत बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू; बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

चांदवड | प्रतिनिधी
तालुक्यातील भडाणे-रायपूर शिवरस्त्यावर गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास मजुरी करून घरी परतणाऱ्या रामदास सिताराम आहेर (वय ४५) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शेतकरी रामदास आहेर मजुरी करून घरी परतत असताना गट नंबर ८३ मध्ये अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रामदास यांच्यावर झडप घेत त्यांच्या गळ्याला धरत रस्त्याच्या बाजूला झुडपात घेऊन गेला. यावेळी सचिन भाऊसाहेब आहेर हे याच रस्त्याने गाडीवरून जात असताना त्यांना रस्त्यावर रक्ताचे डाग दिसले. झाडांमध्ये आवाज आल्यामुळे त्यांनी गाडीचा प्रकाश त्या दिशेने टाकला असता त्यांना बिबट्या दिसून आला. त्यांनी तत्काळ आरडाओरडा करत परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. आवाजाने बिबट्याने तेथून पळ काढला यावेळी घटनास्थळी पहाणी केली असता रामदास आहेर यांचा गळाच बिबट्याने फाडल्याने रामदास मृत अवस्थेत आढळून आले.

सदर घटनेची माहिती रघुनाथ वाघ यांनी तत्काळ वनविभागाला दिली. वनविभागाने रात्रीच पंचनामा करून मृतदेह चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला. मयत रामदास यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली,एक मुलगा व वडील,भाऊ असा परिवार आहे. बिबट्याच्या हल्ल्यात रामदास यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. वनविभागाकडून पुढील तपास व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे भडाणे, रायपूरसह पंचक्रोशीत ग्रामस्थांमध्ये बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पुन्हा एकदा मानवी जीवन धोक्यात येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या