Friday, May 3, 2024
Homeनाशिक...अन् शेतात बहरलं 'पिवळं सोनं'; पाहा देशदूतचा खास Ground Report

…अन् शेतात बहरलं ‘पिवळं सोनं’; पाहा देशदूतचा खास Ground Report

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील (Chandwad Taluka) बहुसंख्य शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी पारंपारिक जल स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. जलसिंचनाची अपुरी सुविधा, पावसाची अनिश्चितता, बाजाराची अशास्वती या सर्व समस्यांना भिडण्यासाठी तालुक्यातील देनेवाडी येथील शेतकरी शिवाजी मोरे यांनी आपल्या शेतीत (Agriculture) फुलांच्या शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

- Advertisement -

…जेव्हा महिला शेतकरी जपते मातीशी नाते; ‘पाहा’ व्हिडीओ

मोरे यांना लहानपणापासून फुलांची आवड असल्याने त्यांनी त्यांच्या आवडीला व्यावसायिक स्वरुपात परावर्तीत केले. कांदा, टाॅमेटो ही पिके चांदवड तालुक्यात नगदी पिके म्हणून घेतली जातात. मात्र, शिवाजी मोरे यांनी केवळ कांदा, टाॅमेटो अशा पिकांवर अवलंबून न राहता फुलांची शेती (Flower Farming) फुलविली आहे.

याबाबत बोलतांना मोरेंनी सांगितले की, झेंडूच्या शेतीला लागणारा खर्च आणि कालावधी हा मर्यादित असून कमी संसाधनांमध्ये चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी झेंडूची शेती हा एक चांगला पर्याय आहे. तसेच झेंडूच्या फुलांचे वर्षातून तीन वेळा उत्पन्न घेता येत असल्यामुळे हे पिक (Crop) कमी कालावधीचे आणि कमी खर्चाचे नगदी पिक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

‘अशी’ आहे मोडाळे गावची सुसज्ज अभ्यासिका; पाहा व्हिडीओ

तसेच या फुलांच्या विक्रीसाठी मोरेंना इतरत्र जाण्याची गरज पडत नसून व्यापारी बांधावर येऊन फुले खरेदी करतात. तर दसरा, दिवाळी, गणेशोत्सव अशा सणासुदीच्या काळात या फुलांना मोठी मागणी असते म्हणून या पिकाकडे वळायला हवे असा मोलाचा सल्लाही शिवाजी मोरेंनी शेतकऱ्यांना (Farmers) दिला आहे.

मालेगावी बिऱ्हाड मोर्चास सुरुवात

- Advertisment -

ताज्या बातम्या