Sunday, January 25, 2026
HomeनगरAhilyanagar : मदत आली, पण अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी नसणार्‍या शेतकर्‍यांना करावी लागणार ई-...

Ahilyanagar : मदत आली, पण अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी नसणार्‍या शेतकर्‍यांना करावी लागणार ई- केवायसी

ऐन सणासुदित शेतकर्‍यांची होणार धावपळ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिके, फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचलत जिल्ह्यासाठी 846 कोटी 96 रुपये अनुदान मंजूर केला. मात्र, ज्या शेतकर्‍यांकडे फार्मर आयडी आहे, ज्यांनी अ‍ॅग्रिस्टॅक प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा शेतकर्‍यांना ई-केवायसी करण्याची गरज नाही. मात्र, ज्यांच्याकडे अ‍ॅग्रिस्टॅक क्रमांक नाही, त्यांना सीएससी सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया करावी लागणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या अ‍ॅग्रिस्टॅअंतर्गत नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन यांच्यावतीने वेळोवळी शेतकर्‍यांना या नोंदणीचे महत्व पठवून देण्यात आलेले आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यात जवळपास 30 टक्के शेतकर्‍यांनी अ‍ॅग्रिस्टॅअंतर्गत नोंदणी केलेली नाही. या शेतकर्‍यांची आता मदतीच्या पैशासाठी ऐन दिवाळीत धावाधाव होणार आहे. जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. शेतात पाणी साचल्यामुळे काढणीला आलेली पिके बाधित झाली होती. विशेष म्हणजे एका-एका महसूल मंडळात दोन ते तीनवेळा अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.

YouTube video player

जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा अहवाल तयार करून राज्य शासनाला पाठविला आहे. जिल्ह्यातील 8 लाख 27 हजार 118 शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला होता. यासाठी राज्य शासनाने वेगाने पावले उचलत 846 कोटी 96 लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. नगर जिल्ह्यात 11 लाख 17 हजार 282 शेतकरी आहेत. यातील 7 लाख 94 हजार 645 शेतकर्‍यांनी फार्मर आयडी काढले असून अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणीमध्ये अहिल्यानगर जिल्हा 71.12 टक्क्यांसह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांनी सर्वाधिक 87.25 टक्के अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी केली आहे, तर सर्वांत कमी टक्केवारी संगमनेर तालुक्याची 51.52 टक्के आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकर्‍यांच्या अनुदान अपलोड करण्याची प्रक्रिया पोर्टलमध्ये सुरू आहे. ज्या शेतकर्‍यांकडे फार्मर आयडी आणि ग्रिस्टॅक आयडी नसेल तर सीएससी सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.

कर्जखात्यात मदतीचे पैसे वर्ग करून नका
नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात मदत येणार आहे. मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थी व मदतीचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असून शेतकर्‍यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात वळती करू नये, अशा सुचना बँकांना देण्यात आलेल्या आहेत.

जामखेड सर्वाधिक, संगमनेर सर्वात कमी तालुकानिहाय फार्मर आयडी (टक्केवारी)
अकोले 86.93, जामखेड 87.25, पारनेर 86.92, श्रीरामपूर 83.88, कर्जत 76.08, राहुरी 76.38, नेवासा 74.96, कोपरगाव 73.08, शेवगाव 71.21, राहाता 68. 06, श्रीगोंदा 67.67, पाथर्डी 64.25, नगर 63.01 आणि संगमनेर 51.52 यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिव्हिलची ‘शल्यक्रिया’ कधी होणार ?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिव्हिल हॉस्पिटल हे खरंतर गोरगरिबांना चांगले उपचार मिळवून देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचे ठिकाण. तेथे आरोग्याच्या दर्जेदार...