Friday, September 11, 2026
HomeनगरNewasa : नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांना मागील खरीप पिकांच्या विमा परताव्याची प्रतिक्षा

Newasa : नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांना मागील खरीप पिकांच्या विमा परताव्याची प्रतिक्षा

केवळ सोयाबीनचा परतावा || कपाशी, तूर, बाजरी व कांदा उत्पादकांना अद्याप परतावा नाही

पाचेगाव फाटा |वार्ताहर| Pachegaon Phata

नेवासा तालुक्यातील शेतकरी मागील वर्षीच्या खरीप हंगामातील कपाशी, तूर, बाजरी पिकांच्या विमा परताव्याची वाट पाहत आहे. तालुक्यातील 16 हजार 131 शेतकर्‍यांना सोयाबीन विमा परतावा मिळाला. त्यात 11हजार 434 हेक्टर क्षेत्रावर 16 हजार 131 शेतकर्‍यांनी सोयाबीन या पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता,त्यात शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 34.27 टक्के नुकसानभरपाई ग्राह्य धरण्यात येवून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात मागील महिन्यात रक्कमा जमा करण्यात आल्या.

- Advertisement -

सोयाबीन पिकांचा पीक विमा परतावा मिळाला मग कपाशी, तूर, बाजरी, कांदा आदी खरिप हंगामातील पिकांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात नेवासा तालुक्यातील सर्व महसूल मंडळातून जवळपास 24 हजार 403 शेतकर्‍यांनी कापूस पिकाचा विमा उतरविला असून त्यात 15 हजार 630 हेक्टर क्षेत्रावर विमा घेतला आहे. तूर पिकाचा विमा 3 हजार 226 शेतकर्‍यांनी 1 हजार 953 हेक्टर क्षेत्रावर उतरविला आहे. बाजरी पिकाकरीता 502 शेतकर्‍यांनी 251 हेक्टर क्षेत्रावर पीक विमा घेतला आहे.कपाशी पीक विम्यापोटी शेतकरी हिस्सा म्हणून 2 कोटी 81 लाख 34 हजार 504 रु भरले आहे. तर तूर पिकांसाठी शेतकरी हिस्सा म्हणून 18 लाख 36 हजार 127 रुपये भरले असून बाजरीसाठी 1 लाख 60 हजार 768 रुपये इतकी रक्कम तालुक्यातील शेतकर्‍यांनी पीक विमा कंपन्याना शेतकरी हिस्सा म्हणून भरली आहे.

खरीप हंगामातील यापैकी सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई सामूहिक तत्वावर (यिल्ड बेस) संपूर्ण तालुक्याची 34.27 टक्के नुकसान भरपाई ग्राह्य धरण्यात येवून हेक्टरी 20 हजारांपर्यंत मिळालेली असून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. पण अद्याप बाजरी, तूर व कपाशीचे आतिम अहवाल व कॅल्क्युलेशन अद्याप बाकी असल्याचे माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने मागील खरीप 2025 मध्ये अतिवृष्टीने सर्वच पिके बाधित असल्याकारणाने सर्व पिकांची नुकसान भरपाई देण्यास विमा कंपन्यांना भाग पाडावे.कारण शेतकर्‍यांच्या पिकाचे नुकसान होऊन देखील वैयक्तिक तक्रारीची मुभा आता काढून घेण्यात आलेली आहे. भरपाई ही फक्त पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम अहवालावर अवलंबून असल्याने शासनाचे हे दायित्व आहे की कंपन्यांना नुकसान भरपाई देण्यास भाग पाडावे अशी मागणी तालुक्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी केली आहे.

कपाशी, तूर, बाजरी या तीन पिकांचे तालुक्यातील 28 हजार 131 शेतकरी अजूनही वंचित आहे. कृषी विभागाकडून राज्य शासनाकडे या पिकाचे कापणी प्रयोग अहवाल सादर करण्यात असल्याची माहिती मिळाली असून लवकरच या पिकांचे पीक विमा परतावा रक्कमा शेतकर्‍यांना मिळतील असे सांगितले गेले होते, पण दुसरा खरीप हंगाम उजाडला तरी अजूनही या पिकाचे विमा परताव्याची रक्कमा शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होईना. एकतर कोणत्याच पिकाला शेतकर्‍यांना दर मिळणं त्यात शेती निगडित सर्व दारांची भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.त्यात या पीक विम्यात शेतकर्‍यांच्या पिकाचे नुकसान होऊन देखील कोणतीच ऑनलाइन ऑफलाईन तक्रार घेतली जात नाही. विशेष म्हणजे शेतकर्‍यांचा पीक विम्यात हिस्सा देखील घेतला जातो. मग आता फक्त पीक कापणी प्रयोग तत्वावर अवलंबून असल्याने कपाशी, तूर, बाजरी व कांदा पिकाची भरपाई ही तालुक्यातील शेतकर्‍यांना पीक कापणी अहवालावरच मिळणार आहे आणि ती मिळालीच पाहिजे अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे.

3 कोटीची विमा रक्कम भरली
नेवासा तालुक्यातील सर्व महसूल मंडळातून कपाशी तूर व बाजरी पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 28 हजार 131 शेतकर्‍यांनी सहभाग घेतला होता, त्यात या तिन्ही पिकाकरिता विम्यापोटी शेतकरी हिस्सा म्हणून पीक विमा कंपनीला जवळपास 3 कोटी 1 लाख 31 हजार 399 रुपये इतकी रक्कम भरली आहे. मागील परतीच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांच्या अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे मागील वर्षीचा खरीप विमा तातडीने मिळावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

कपाशी व अन्य पिकांच्या विम्याबाबत सूचना नाही
मागील खरीप हंगामातील कापूस पिकाचा तालुका अहवाल फेब्रुवारी महिन्यातच वरिष्ठ पातळीवर सादर केलेला आहे, पण कृषी विभाग अंतर्गत अजून कोणत्याही प्रकारचा मागील खरीप हंगामातील कापूस व इतर पिकांच्या पीक विम्या संदर्भात सूचना आलेली नाही, त्यामुळे तालुका पातळीवर आज रोजी तरी काहीच माहिती उपलब्ध नाही
धनंजय हिरवे, तालुका कृषी अधिकारी, नेवासा

ताज्या बातम्या

BRICS

BRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताच्या अध्यक्षतेखाली १८वी BRICS शिखर परिषद (18th BRICKS Summit 2026) १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत...