Thursday, May 2, 2024
Homeनगरएकरभर फ्लॉवरच्या पिकावर शेतकऱ्याने फिरविला रोटाव्हेटर !

एकरभर फ्लॉवरच्या पिकावर शेतकऱ्याने फिरविला रोटाव्हेटर !

तळेगाव दिघे | वार्ताहर | Talegaon Dighe

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे (आरामपूर) येथील एका शेतकऱ्याने फ्लॉवर मातीमोल भावाने विकले जात असल्याने एकरभर फ्लॉवर पिकावर अक्षरशा ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटर फिरविला.

- Advertisement -

फ्लॉवरला अवघा एक रुपया किलो भाव मिळत असल्याने फ्लॉवर काढणीचा खर्चही वसूल होणे अवघड झाल्याने आपण फ्लॉवर पिकावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटर फिरविला, असे शेतकरी गोविंद सावित्रा दिघे यांनी सांगितले.

तळेगाव दिघे (आरामपूर) येथील शेतकरी गोविंद सावित्रा दिघे यांनी एक एकर क्षेत्रात फ्लॉवर या भाजीपाला पिकाची उभारणी केली होती. मात्र फ्लॉवर पिक काढणीस व विक्रीस आले असताना भाव गडगडत मातीमोल झाले. पिकाचा खर्च सोडाच, मात्र पिक काढणीसाठी लागणारा खर्चही वसूल होणे मुश्कील झाल्याने गोविंद दिघे यांनी फ्लॉवर पिकावर रोटाव्हेटर फिरविला. व्यापाऱ्याने फ्लॉवर एक रुपये किलो दराने मागितले. तेही फ्लॉवर शेतातून काढून गोण्यांमध्ये भरून देण्यास सांगितले होते. फ्लॉवर शेतातून काढून गोण्यांमध्ये भरून देणे परवडणारे नव्हते. त्यामुळे आपण फ्लॉवर पिकावर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटर फिरविला, अशी व्यथा शेतकरी गोविंद दिघे यांनी मांडली. सध्या फ्लॉवरला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या