Monday, May 6, 2024
Homeजळगावचाळीसगावात पुन्हा युरियासाठी शेतकर्‍यांच्या रागा

चाळीसगावात पुन्हा युरियासाठी शेतकर्‍यांच्या रागा

चाळीसगाव – Chalisgaon

तालुक्यात शेतकर्‍यांना बर्‍याच दिवसांपासून युरिया उपलब्ध होत नव्हता, परंतू आमदारांच्या मदतीने आमळनेर येथून युरियाचा काही प्रमाणात साठा मागील बुधवारी मागविण्यात आला होता. तो काही तासात संपला होता. आता पुन्हा काल तालुक्यासाठी १२५ टन युरियाचा साठा उपलब्ध झाला आहे. तो घेण्यासाठी आज संकाळ पासून शहरातील कृषी केंद्रांवर शेतकर्‍यांच्या रागा लागल्याचे दिसून आले. तसेच तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी १२५ टन युरिया पुरेसा नसल्यामुळे अजुन युरियाची मागणी होत आहे.

- Advertisement -

तालुक्यात गेल्या २० ते २५ दिवसांपासून बक्यापैकी पाऊस झाल्यानंतर शेतातील उगवलेली पीके वाढली आहेत. पिकांच्या वाढीसाठी व पोषणासाठी युरिया या खताची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून चाळीसगांव तालुक्यात युरीयाची टंचाई निर्माण झाल्यानंतर काही दिवसांपासून कृषी केंद्रांवर युरीया शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहर व तालुक्यात युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवानी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे केल्या होत्या.

आमदारांनी तात्काळ दखल घेत, अमळनेर येथे आलेल्या युरियाच्या रॅकमधून काही प्रमाणात युरिया चाळीसगावसाठी देण्याची विनंती केल्यानतंर चाळीसगावसाठी काही प्रमाणात युरिया मागील आठोड्यात उपलब्ध झाला होता. तो घेण्यासाठी शेतकर्‍यांनी भर पावसात रागा लावल्या होत्या, त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण हे स्वता; कृषी केंद्रावर जावून त्यांनी शेतकर्‍यांना युरिया मिळऊन देण्यास मदत केली होती.

परंतू तो युरियाचा साठा काही तासात संपल्यामुळे, पुन्हा शेतकर्‍यांपुढे तोच प्रश्‍न उभा राहिला होता. शेतकर्‍यांच्या मागणीनूसार काल तालुक्यासाठी युरियाचा १२५ टन साठा उपलब्ध झाला, तो घेण्यासाठी आज(गुरुवारी) संकाळपासूनच शहरातील कृषीकेंद्राबाहेर शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. शहरासह तालुक्यातील सात कृषी केद्रांवर युरियाचे वाटप झाले. यात वर्धमान कृषी केंद्र, सुलक्ष्मी कृषी केंद्र, पंकज एजन्सी, सुयोग कृषी केंद्र, येवले ब्रदर्स, बहाळ, तळगाव, वलठाण आदिच्या कृषी केद्रंाचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या