Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशशेतकऱ्यांचं आजपासून 'किसान संसद'; दिल्लीला पुन्हा छावणीचं स्वरूप

शेतकऱ्यांचं आजपासून ‘किसान संसद’; दिल्लीला पुन्हा छावणीचं स्वरूप

दिल्ली | Delhi

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू करुन आता आठ महिने झाले आहेत. पण केंद्र सरकार कायदे मागे घेण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांनीही आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी दिल्लीत धडक देण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना जंतर-मंतरवर ‘किसान संसद’ आयोजित करणार असल्याचे शेतकरी संघटनने मंगळवारी सांगितले. २२ जुलैपासून म्हणजेच आजपासून रोज सिंघू सीमेवरुन २०० आंदोलक शेतकरी जंतर-मंतरवर हजेरी लावणार आहेत.

दरम्यान शेतकर्‍यांना जंतर-मंतरवर निषेध आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मोठ्या सुरक्षेदरम्यान शेतकरी आजपासून जंतर-मंतर येथे ‘किसान संसद’ सुरू करणार आहेत. शेतकर्‍यांची आंदोलने लक्षात घेता सिंघू सीमेपासून जंतर-मंतर पर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्वत्र पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी जास्तीत जास्त २०० शेतकर्‍यांना ९ ऑगस्टपर्यंत निषेध करण्यास विशेष परवानगी दिली आहे. दिल्ली पोलिसातील सूत्रांनी सांगितले की, पोलिस संरक्षण असणार्‍या गुरुवारी सकाळी १० वाजता सिंघू सीमेवरून निघेल व साडेअकरा वाजेपर्यंत जंतरमंतरवर पोहोचेल. संध्याकाळी पाचवाजेपर्यंत शेतकऱ्यांची ‘किसान संसद’ भरेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या