Friday, November 22, 2024
HomeनाशिकLoksabha Election 2024 : कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांनी केले मतदान

Loksabha Election 2024 : कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांनी केले मतदान

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील वडगाव पंगु तालुका चांदवड (Chandwad) येथील युवा शेतकऱ्यांनी (Farmer) केंद्र सरकारच्या धोरणावर रोष व्यक्त करत कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केल्याचे बोलले जात आहे. तसेच यावेळी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला येत असतांना या शेतकऱ्यांना पोलिसांनी (Police) अडविल्याने मतदान केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांनी या शेतकऱ्यांना अडविल्यानंतर त्यांना कांद्याच्या (Onion) माळा काढून मतदान करण्यास सांगितले. मात्र, कांदा हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने आम्ही माळा गळ्यात घालूनच मतदान करणार असा, आग्रह या शेतकऱ्यांनी धरला. तसेच “ज्याने केली निर्यातबंदी त्याला नाही सत्तेची संधी” अशा घोषणाही या शेतकऱ्यांनी दिल्या. यावेळी मोठा जनसमुदाय जमा झाल्याने मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, या प्रकारावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नेल्याने मतदान अधिकारी त्यावर काही करू शकत नाहीत. त्यामुळे मतदान करा, कांद्याच्या माळा घालून गेलो म्हणून मतदान करू शकलो नाही असं करू नका. कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा, जे कोणी राजकारणी आहेत त्यांना दाखवा. राजकारण्यांपुढे सत्याग्रह करा”, असे आवाहनही यावेळी भुजबळ यांनी या शेतकऱ्यांना केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या