Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक पोलिसांचा सन्मान : आयुक्तालयातील सोनवणे, राऊत व ग्रामीणचे देवरे यांना राष्ट्रपती...

नाशिक पोलिसांचा सन्मान : आयुक्तालयातील सोनवणे, राऊत व ग्रामीणचे देवरे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर केली आहेत.

या प्रतिष्ठेच्या यादीत नाशिक शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक सुरेश साहेबराव सोनवणे, सहायक उपनिरीक्षक नरेंद्र सखाराम राऊत आणि नाशिक ग्रामीण पोलिस दलातील वाचक उपनिरीक्षक विजय प्रभाकर देवरे यांचा समावेश झाल्याने पोलिसांचा सन्मान वाढला आहे.

देशभरातील १ हजार ९० पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना शौर्य, उत्कृष्ट सेवा व गुणवत्तापूर्ण कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले असून, त्यात महाराष्ट्रातील ४९ अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दरम्यान, नाशिक ग्रामींण पोलिस दलातील उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी आणि मोहन पाटील यांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.

ताज्या बातम्या

राज

सत्तेला ‘नाही’ म्हणण्याचं सामान्य माणसाचं सामर्थ्य! गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट...

0
मुंबई | Mumbaiदेशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अनेक नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. राजघाटावर राष्ट्रपतींसह उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी महात्मा गांधींना अभिवादन...