Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकौटुंबिक वादातून वडिलांची हत्या; मुलास अटक

कौटुंबिक वादातून वडिलांची हत्या; मुलास अटक

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

कौटुंबिक वादातून पित्याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करीत निर्घृण खून करणार्‍या मुलास तालुका पोलिसांनी अटक केली आहे तालुक्यातील भिलकोट गावात काल रात्रीच्या सुमारास ही खळबळ उडून देणारी घटना घडली.

यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की भिलकोट गावातील रहिवासी पंढरीनाथ कौतिक निकम ७० व त्यांचा मुलगा श्रीकांत निकम यांच्यात घरगुती कारणावरून सतत वाद होत होते. काल सर्वत्र दसरा सण साजरा होत असताना पिता-पुत्रांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला यातूनच संतापलेल्या श्रीकांत वडील पंढरीनाथ यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली दांडक्याचा डोक्यावर घाव बसल्याने गंभीररित्या जखमी झालेले पंढरीनाथ जागीच गतप्राण झाले.

या घटनेची माहिती मिळता च तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी उपनिरीक्षक तुषार भदाणे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत हल्लेखोर मुलगा श्रीकांत यास ताब्यात घेतले त्यांच्या त्याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

ताज्या बातम्या

Nashik Water News : अंबोली धरण कोरडे; त्र्यंबकेश्वरवर पाणीसंकट, गंगापूरमध्ये ११.४...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वर नगर परिषदेला (Trimbak Nagar Parishad) पाणीपुरवठा करणाऱ्या अंबोली धरणातील (Amboli Dam) उपयुक्त पाणीसाठा शून्यावर पोहोचल्याने तेथील पाणीस्थिती अत्यंत चिंताजनक...