Saturday, June 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजप्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेत्यांवर एफडीएची कारवाई

दोन कोटी किमतीचा गुटखा जप्त

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) गुटखा मुक्त महाराष्ट्र मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत राज्यभरात करण्यात आलेल्या कारवाईत गुटखा, पानमसाला विक्रेत्यांना लक्ष्य करण्यात आले असून १९५ ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत १९२ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरातून सुमारे १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ कोटींचा गुटखा, पानमसाल्याचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर धाराशीव, धुळे, नांदेड, पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी धाडसत्र हाती घेत मोठ्या कारवाया केल्या. यामध्ये धाराशीव येथील परांडा येथे करण्यात आलेल्या कारवाईत १ कोटी दोन लाख ६७ हजारांचा साठा जप्त करण्यात आला.

समृद्धी महामार्गावर सावंगी टोलनाका येथे घालण्यात आलेल्या धाडीत ६० लाख ५० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र – तेलंगणा सीमा भाग, नांदेड, येथे करण्यात आलेल्या कारवाईत १७ लाख ५२ हजार रुपये किमतीचा माल आणि वाहने जप्त करण्यात आली. पिंपरी-चिंचवड येथील मोशी येथे करण्यात आलेल्या कारवाईत ६ लाख १९ हजारांचा माल जप्त करण्यात आला असून ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक, विक्रीस आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत असून यापुढेही ही कारवाई सुरू राहणार आहे. गुटखा मुक्त महाराष्ट्र, निरोगी महराष्ट्र ही मोहीम केवळ कायदेशीर कारवाई नसून महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी सुरू असलेली निर्णायक लढाई आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात सरकारने आता शून्य सहनशीलता धोरण स्वीकारले असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.

विभागनिहाय कारवाया

कोकण विभाग – ७९ धाडी, ७८ जणांना अटक
पुणे विभाग – ५२ धाडी, ५२ जणांना अटक

मुंबई – १५ धाडी, ३० जणांना अटक
नागपूर – ८ धाडी, ८ जणांना अटक

छत्रपती संभाजीनगर – ९ धाडी, ८ जणांना अटक
अमरावती – २ धाडी, १ अटकेत

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यात दोन महत्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik राज्यातील रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांची अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर...