Friday, November 15, 2024
HomeनाशिकNashik Political: भय, ड्रग्जमुक्त नाशिक अन् बेरोजगार युवकांच्या स्वप्नांना बळ

Nashik Political: भय, ड्रग्जमुक्त नाशिक अन् बेरोजगार युवकांच्या स्वप्नांना बळ

मध्य नाशिकसाठी वसंत गिते यांची वचनांची पंचसूत्री

नाशिक | प्रतिनिधी
विधानसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक मध्य मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांनी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी वचनांची पंचसूत्री जाहीर केली आहे. ड्रग्जमुक्त नाशिक, भयमुक्त नाशिक, बेरोजगारीत गुरफटलेल्या युवकांच्या स्वप्नांना बळ, वाहतुकीच्या चक्रव्युहातून सुटका व गोदामाईचा शाश्वत विकास या वचनांच्या पंचसूत्रीद्वारे नाशिकचा विकास साधण्यासाठी पुन्हा एकदा मशाल बा चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशिर्वाद देण्याचे आवाहन माजी आमदार वसंत गिते यांनी केले आहे.

राज्याच्या विकासाचा सुवर्ण त्रिकोण साधणाऱ्या मुंबई, पुणे या शहरांपाठोपाठ नाशिकचा उल्लेख अनिवार्य होता. मात्र गेल्या १० वर्षांत शहराची सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाल्यामुळे यंदा पुन्हा मध्य नाशिकचे नेतृत्व करण्यासाठी वसंत गिते हे सज्ज झाले आहेत. शहराचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून कार्यरत रहाताना गिते यांनी वचनांची पंचसूत्री जाहीर केली आहे. ही वचने पुढीलप्रमाणे आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा: Nashik Political: ॲड. राहुल ढिकले यांना मताधिक्य मिळेल

ड्रग्जमुक्त नाशिक
राज्यात गेल्या काही वर्षात ड्रग्ज माफियांनी तरुण पिढीला नशेबाजीच्या विळख्यात ओढून स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा डाव रचला आहे. या ड्रग्ज माफियांनी नाशिकला सॉफ्ट टार्गेट केल्याचे गेल्या वर्षभरात पुढे आलेल्या घटनांनी सिद्ध झाले आहेत. या ड्रग्ज माफियांना राजाश्रय लाभल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहे. हे संकट लक्षात घेऊन वसंत गिते यांनी ड्रग्ज विरोधातील लढाईला प्रारंभ केला आहे. नाशिक शहराला मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जचा विळखा बसला असून याची पाळेमुळे खोलपर्यंत रुजली गेली आहेत. मुख्य म्हणजे या ड्रग्ज तस्करचा मास्टर माईंड हा नाशिक शहरातील असल्याने आगामी काळात ही साखळी मोडून काढण्याचे आव्हान गिते यांनी स्वीकारले आहे.

भयमुक्त नाशिक
भाविकांचे शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिकमध्ये गेल्या १० वर्षांत गुन्हेगारीने कळस गाठला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, चेनस्नॅचिंग, घरफोडी, वाहन चोरी यामुळे नाशिककर भयभीत झाले आहे. यंत्रणेवरील राजकीय दबाव यामुळे पोलिसिंगलाही मर्यादा आल्या आहेत. पोलिसांची क्षमता असूनही त्यांना कर्तव्य निभावता येत नाही. यासाठी जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून आगामी काळात कार्यरत रहाण्याचा मानस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांनी व्यक्त केला. शहरातील गुन्हेगारीचा फटका भाविकांनाही बसला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शहरात येणारा शस्त्रसाठा, वाढलेली कोयता संस्कृती यामुळेही त्यांनी चिंता व्यक्त केली.

युवकांच्या स्वप्नांना बळ
मंत्रभूमी ते तंत्रभूमी असा प्रवास करणाऱ्या नाशिकमध्ये बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवूनही तरुण-तरुणी नोकरीसाठी वणवण हिंडत आहेत. या युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी गुन्हेगारीने कळस गाठला आहे. खून, खुनाचा प्रयत्न, चेनस्नॅचिंग, घरफोडी, वाहन चोरी यामुळे नाशिककर भयभीत झाले आहे. यंत्रणेवरील राजकीय दबाव यामुळे पोलिसिंगलाही मर्यादा आल्या आहेत. पोलिसांची क्षमता असूनही त्यांना कर्तव्य निभावता येत नाही. यासाठी जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून आगामी काळात कार्यरत रहाण्याचा मानस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांनी व्यक्त केला. शहरातील गुन्हेगारीचा फटका भाविकांनाही बसला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शहरात येणारा शस्त्रसाठा, वाढलेली कोयता संस्कृती यामुळेही त्यांनी चिंता व्यक्त केली.आगामी काळात जाणीवपूर्वक काम केले जाईल, असे उमेदवार वसंत गिते यांनी नमूद केले. औद्योगिक वसाहतीतील समस्या व उद्योजकांच्या अडचणी दूर होण्यासाठी पुढाकार घेऊ, असेही गिते म्हणाले.

वाहतुकीची कोंडी सुटणार
नाशिक शहरातील वाहतूक दिवसेंदिवस जीवघेणी होत आहे. यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले तर काहींना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. द्वारका, मुंबई नाका, सारडा सर्कल यासारखे ब्लॅक स्पॉट व तेथील समस्यांचा तज्ञांद्वारे अभ्यास करून निपटारा केला जाईल. रस्त्यांची दुरवस्था वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असून शहरातील रस्ते दर्जेदार व्हावे, यासाठी प्राधान्याने काम केले जाईल, असे अभिवचन गिते यांनी दिले आहे. शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचा अधिक ताण वाहतुकीवर पडतो. हा ताण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याची गरज आहे. त्यासाठीही अभ्यासपूर्वक प्रयत्न केले जातील, असेही गिते म्हणाले.

गोदामाईचे संवर्धन होणारच
धार्मिकदृष्ट्या महत्त्व असणारा कुंभमेळा २०२६-२७ मध्ये गोदाकाठी होत आहे. मात्र सध्या गोदावरीची अवस्था बिकट आहे. आगामी कुंभमेळ्यासाठी गोदामाईचे संवर्धन तसेच गोदाकाठचा शाश्वत विकास करण्यासाठी सुयोग्य नियोजन केले जाईल, अशी ग्वाही गिते यांनी दिली. उज्जैन, काशी कॉरिडॉरसारखा त्र्यंबकेश्वर-नाशिक कॉरिडॉर होण्यासाठी आजवर प्रयत्न झाले नाही, येणाऱ्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर हा कॉरिडॉर होण्यासाठी अग्रक्रमाने प्रयत्न करणार असल्याचे सांगताना कुंभमेळ्याचे परीपूर्ण नियोजन करून शहराचा नावलौकिक वाढावा, यासाठी केंद्र, राज्य सरकार तसेच महापालिका यांच्यात समन्वयासाठी पाठपुरावा केली जाईल, असेही गिते म्हणाले. कुंभमेळ्यापूर्वी शहराचा चेहरामोहरा बदलणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी शासन व विविध संस्था यांच्यातील समन्वयातून प्रयत्न केले जातील, असेही वसंत गिते म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या