Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारवीजेचा शॉक लागून मादी बिबट्याचा मृत्यू

वीजेचा शॉक लागून मादी बिबट्याचा मृत्यू

म्हसावद । वार्ताहर- nandurbar

अनकवाडे (ता.शहादा) गावालगत एका महिन्यात सलग दुसर्‍यांदा त्याचठिकाणी केळीच्या शेतात मादी बिबट्या विजेचा शॉक लागून मृत झाल्याची घटना घडली आहे. कडूलिंबाच्या झाडावर चढताना मुख्य विद्युत वाहिनीच्या तारेला स्पर्श झाल्याने बिबट्या मादी खाली पडून मृत झाली. मुख्य विद्यूत वाहिनीचे तार हे कडूलिंबाच्या फांद्यांमधून गेले आहेत.

- Advertisement -

अनकवाडा गावाजवळ शेतकरी ईश्वर मनीलाल पाटील, चंद्रकांत मणिलाल पाटील (रा.अनकवाडे) यांच्या सर्वे नंबर 5 क्षेत्रात केळीच्या शेताच्या बांधावर कडूलिंबाचे मोठे झाड आहे. त्याच्यामधून मुख्य विद्युत वाहिनीचे तार गेलेले आहेत. बिबट्या कडुलिंबाच्या झाडावर चढत असताना विद्युत वाहिनीच्या शॉक लागून दोन दिवसापूर्वी जागेवरच मृत झाला आहे.अंदाजे दोन वर्ष वयाची मादी असून दोन पिल्लेही पाहिल्याची माहिती उपस्थितांनी दिली. शॉक लागलेल्या ठिकाणी बिबट्याचे केसही चिकटल्याचे दिसत आहेत. याबाबत राणीपूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल एम.बी.चव्हाण, वनपाल संजय पवार, वनरक्षक राधेश्याम वळवी, रेखा खैरनार, सत्तरसिंग वळवी यांनी उपस्थित राहून पंचनामा केला. त्यांना वन्यजीव संस्था नंदुरबारचे अध्यक्ष सागर निकुंबे, हेमंत पवार, दिनेश पवार यांनी सहकार्य केले. बिबट्या मादीस राणीपूर येथे नेण्यात आले असून संध्याकाळी अंत्यविधी करण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय अधिकारी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका पशुवैद्यकीय लघू सर्व चिकीत्सालय शहादाचे डॉ.संजीत धामणकर उपस्थित होते. मात्र, शॉक लागून दोन तीन दिवस घटनेला झाल्याने बिबट्याचे शरीर कुजलेल्या स्थितीत झाल्याने शवविच्छेदन करता आले नाही, असे डॉ.धामणकर यांनी सांगीतले.

राणीपूर वनविभागाचे दुर्लक्ष

6 ऑगस्टला याच ठिकाणी शॉक लागून अडीच वर्षे वयाची मादी बिबट्या, आता दोन वर्षाची मादी बिबट्या शॉक लागून मृत झाली.कडूलिंबाची फांदी तोडून टाकावी अशी चर्चा 6 ऑगस्टला उपस्थित कर्मचारी वर्गात झाली होती. शिवाय दोन पिल्ले असल्याची चर्चाही होती. त्यावेळीच राणीपूर वनविभागाने कडूनिबांची फांदी तोडली असती किंवा पिंजरा लावला असता तर दुसरी घटना घडली नसती. याला राणीपूर वनविभागाचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याची आज घटनास्थळी चर्चा सुरू हो

- Advertisment -

ताज्या बातम्या