Friday, May 3, 2024
Homeनाशिक‘फिवर क्लिनिक’द्वारे तपासणी मोहीम

‘फिवर क्लिनिक’द्वारे तपासणी मोहीम

सातपूर । प्रतिनिधी Satpur

सातपूर विभागात मनपाकडून ‘फिवर क्लिनिक’द्वारे तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. त्याचवेळी स्थानिक पातळीवर रुग्ण सेवा देणार्‍या डॉक्टर बांधवांनी तापांचे अथवा कोविड सदृश रुग्ण आढळल्यास आपल्या उपचार पत्रावर शिफारस लिहून जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्याचे आवाहन सातपूर विभागाचे कोविड उपचार समन्वयक डॉ. योगेश कोशिरे यांनी केले.

- Advertisement -

सातपूर विभागातील वैद्यकीय सेवा देणार्‍या डॉक्टर बांधवांची विशेष बैठक मनपा विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अमोल वाजे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे वीस ते पंचवीस डॉक्टर्स उपस्थित होते.

नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात फिवर क्लिनिक सुरू करण्यात येणार असून मनपाच्या माध्यमातून परिसरात सात टीमद्वारे सकाळ व दुपार अशा दोन टप्प्यांमध्ये रुग्ण तपासणी अहवाल तयार केला जाणार आहे.

या माध्यमातून ताप असणार्‍या रुग्णांची विशेष तपासणी केली जाणार आहे. यासाठी परिसरातील वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या डॉक्टर बांधवांनी त्यांच्या माध्यमातून तापाचे रुग्ण आढळल्यास, त्यांना थेट तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्याचे आवाहन करण्यात आले.

स्थानिक डॉक्टरांची शिफारस असलीतरी शहरात रुग्णांना रुग्णालयात प्रवेश देण्यासाठी खूप त्रास पडत आहे. याबाबत डॉक्टर संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन दिलेे जाणार असल्याचे डॉ.अमोल वाजेे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या