Saturday, May 18, 2024
Homeधुळेआगामी विधानसभा निवडणूक मजबूत स्थितीत लढवा

आगामी विधानसभा निवडणूक मजबूत स्थितीत लढवा

दोंडाईचा । dondaicha । श.प्र.

विधानसभा निवडणूकीसाठी (assembly elections)एका वर्षाचा कालावधी बाकी आहे. तेव्हा सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला (work Forgetting differences work) लागावे. एकाच छताखाली यावे. बुथ यंत्रणा मजबूत करावी. एका छताखाली येत आपापल्या भागातील जबाबदारी घ्यावी. निष्ठेने आणि मतभेद विसरून प्रामाणिकपणे काम केल्यास (get success) यश मिळेल. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुक मजबूत स्थितीत लढवावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (State President of Nationalist Congress Party) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे केले.

- Advertisement -

शिंदखेडा विधानसभा मतदार संघांच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक तथा मेळावा येथील सौरभ मंगल कार्यालयात घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथ खडसे, माजीमंत्री डॉ हेमंतराव देशमुख, आ. अनिल पाटील, निरीक्षक अर्जुन टिळे, माजी आ.रामकृष्ण पाटील, संदीप बेडस, किरण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. अनिल पाटील म्हणाले की, निवडणूक कुठलीही असो सैन्याची आवश्यकता असते. मावळयांशिवाय लढता येत नसल्याचे सांगून आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधींसाठी मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तर अर्जून टिळे म्हणाले, आपापल्यातील मतभेद विसरून काम करावे. पदाधिकार्‍यांची नियुक्ती, सुसंवाद साधण्याची गरज असल्याचे सांगितले. तर जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, बापू महाजन, जुई देशमुख, संदीप बेडसे यांनी 14 कोटी रूपये निधीच्या मंजुरी कार्याचा आढाव्यासह मतदार संघाचा आढावा सांगून कामाचा लेखाजोखा सांगितला.

जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, बापू महाजन, जुई देशमुख, पोपटराव सोनवणे, रामकृष्ण पाटील, एकनाथ भावसार यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.हेमंतराव देशमुख यांनी आम्ही मतभेद विसरून एकत्र काम करणार असल्याचे सांगत निवडणूक जिकण्याचा निर्धार केला.

यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, किरण शिंदे, अमित पाटील, अ‍ॅड. एकनाथ भावसार, ललित वारुडे, मोतीलाल पाटील, ज्योती देवरे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

एकत्र राहिले तरच निवडणूकीत यश मिळेल

पदाधिकार्‍यांना जबाबदारीचे पालन करावे लागेल. गावपातळीवर संघटना, बुथ, युवक, महिला, अल्पसंख्याक मागासवर्गीय संघटन पोहोचले पाहिजे. एवढे पुर्ण झाले तर पाच हजार कार्यकर्त्यांची फौज तयार होईल. निवडणूका वार्‍यावर जिंकता येत नाही. कार्यकर्त्याची मेहनत सतत असली पाहिजे.सर्वांनी एकत्र राहिले तरच निवडणूक यश संपादन करता येईल. म्हणून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या