Tuesday, September 17, 2024
HomeनाशिकNashik News : पहिने धबधब्यावर तरुणांमध्ये 'दे दणादण'; Video व्हायरल

Nashik News : पहिने धबधब्यावर तरुणांमध्ये ‘दे दणादण’; Video व्हायरल

नाशिक | Nashik

- Advertisement -

पाच दिवसांपूर्वी म्हणजेच रविवार (दि.१४) रोजी जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी गडावर काही पर्यटक (Anjaneri Fort) फिरण्यासाठी आले होते. मात्र, त्यादिवशी त्र्यंबकेश्वरला मुसळधार पाऊस सुरु असल्याने तब्बल १० पर्यटक गडावर अडकून पडले होते. यानंतर सहा तास रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्या पर्यटकांची सुटका करण्यात पर्यटन विभागाला यश आले होते.

हे देखील वाचा : Nashik News : पावसात फिरायला गेले आणि अडकले; अंजनेरी गडावरचा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक Video आला समोर

दरम्यान, त्यावेळी अंजनेरी गडावर जाताना पर्यटकांना सुरक्षारक्षक (Security Gard) आणि वनविभागाने (Forest Department) कारवाई करुन रोखले होते. मात्र, कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून हे पर्यटक अंजनेरी गडावर गेले होते. यानंतर पोलिसांनी या पर्यटकांवर कडक कारवाई केली होती. त्यानंतर आता ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वरच्या पहिने परिसरातील धबधब्यावर तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

हे देखील वाचा : संपादकीय : १८ जुलै २०२४ – मेहनतीचे फळ

मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पहिने (Pahine) येथील धबधब्यावर गेले होते. यावेळी काही तरुणांची (Youth) एकमेकांशी बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी यातील काही तरुणांनी एका तरुणाला पाण्यामध्येच मारहाण केली. त्यामुळे अशा हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करावी अशी, मागणी स्थानिकांसह इतर पर्यटकांनी केली आहे.

दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी करणे आणि गर्दी केल्यास गुन्हा दाखल (Case) करण्याचे आदेश काढले आहेत. मात्र,पोलिसांच्या (Police) या आदेशाला हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांनी केराची टोपली दाखवल्याचे या व्हिडीओतून समोर आले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय?

व्हिडिओमध्ये काही पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतांना दिसत आहे. मात्र, याचवेळी काही हुल्लडबाज तरूण एकमेकांना पाण्यामध्ये धक्काबुक्की करताना दिसत आहेत. तसेच पाण्याच्या प्रवाहामध्ये एका तरूणाला काही तरुण खाली पाडून मारहाण देखील करत आहेत. तर एकजण भलामोठा दगड एका तरुणावर उचलताना दिसत आहे. मात्र, त्याला इतर तरुण रोखत आहेत. तर काही तरुण आरडोओरडा करत एकमेकांना लोटतांना दिसत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या