Sunday, May 19, 2024
Homeजळगावमहापुरुषांबद्दल अपशंब्द वापरणार्‍या मंत्री चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा

महापुरुषांबद्दल अपशंब्द वापरणार्‍या मंत्री चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याने चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन दि,१० रोजी चाळीसगाव पोलीस (police) निरिक्षक यांना देण्यात आले. तसेच ना.पाटील यांच्यावर त्वरित कार्यवाही न केल्यास वंचित बहुजन आघाडी कडुन आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

- Advertisement -

या निवेदनात म्हटले आहे की, भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर बहुजन समाजातील महापुरुषांचा जाणीवपुर्वक अवमान करण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. राज्यपाल कोशारी, सुधांशु त्रिवेदी यांच्यासारख्या अनेक राजकारण्यांच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले असतांनाच व या वादग्रस्त वक्तव्याचा संपुर्ण बहुजन समाजातुन निषेध व्यक्त होत असतांना, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दि.०९/१२/२०२२ रोजी पैठण येथील आयोजित कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरु करण्यासाठी अनुदान मागितले नाही, तर भिक मागीतली आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करुन तमाम बहुजनांच्या भावना दुखावल्या आहेत.

तरी सदर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी व मदमस्त झालेल्या चंद्रकांत पाटलावर जाणीवपुर्वक महापुरुषांचा अवमान करुन सामाजिक भावना भडकावल्या प्रकरणी व सामाजिक तेढ निर्माण होईल. अशा प्रकारचे वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, व चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यास वंचित बहुजन आघाडी कडुन आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर शहराध्यक्ष सागर जाधव, तालुकाध्यक्ष विलास चव्हाण यांच्यासह संजय जाधव, बापु जाधव, विजय जाधव, सुभाष जाधव, सोने आहिरे, मनोज देशमुख, सोनू जाधव, दिपक सोनवणे, विशाल मोरे, सागर गवळी, भागवत बागुल आदिच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या